न्यूयॉर्क : अमेरिकेतील न्यू जर्सी प्रांतातील एका व्यक्तीने ‘युनायटेड एअरलाइन्स’चा आजीवन विमान प्रवासाचा पास २,९०,००० डॉलरला (२.३८ कोटी रुपये) खरेदी केला. या पासवर त्याने ३७३ वेळा प्रवास करून जवळपास २.४४ दशलक्ष डॉलर (२० कोटी रुपये) वाचविले आहेत!टॉम स्टकर असे या व्यक्तीचे नाव आहे. १९९० मध्ये त्यांनी हा पास खरेदी केला होता. (वृत्तसंस्था)
३.२ काेटी किलाेमीटर प्रवास करणारा एकमेव प्रवासी ठरला. २० काेटी रुपयांची एकूण बचत. ८ दशलक्ष किमी प्रवासाचा टप्पा वर्ष २००९मध्येच पूर्ण केला. ४ जणांचा विमानात हृदयविकाराच्या झटक्याने झालेला मृत्यूही पाहिला.
१२० वेळा हनिमूनविमानाच्या पासचा लाभ घेऊन स्टकर हे आपल्या पत्नीला घेऊन तब्बल १२० वेळा हनिमूनला गेले!
आणखी एकाने घेतला हाेता लाभस्टीव राॅथस्टेन हेदेखील अशाच एका लाईफटाईम अनलिमिटेड प्रवासाच्या तिकिटाचे लाभार्थी ठरले हाेते. त्यांनी १९८७ मध्ये अमेरिकन एअरलाइन्सचे तिकीट घेतले हाेते. त्यावरून त्यांनी १० दशलक्ष मैलाचा प्रवास १० हजार उड्डाणांमधून केला. २.५० लाख डाॅलरला त्यांनी हे तिकीट विकत घेतले हाेते. २१ काेटी डाॅलरचा त्यांच्या प्रवासावर विमान कंपनीला खर्च करावा लागला. २००८ मध्ये कंपनीने तिकीट अखेर रद्द केले.