Lokmat Money > बिझनेस न्यूज > Money tips: ७ जुलैला येतेय बक्कळ कमाई करण्याची संधी; IPO लाँच करतेय पुण्याची बडी कंपनी...

Money tips: ७ जुलैला येतेय बक्कळ कमाई करण्याची संधी; IPO लाँच करतेय पुण्याची बडी कंपनी...

Clean Science IPO: क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी ही कंपनी विशेष रासायनिक परफॉर्मेंस केमिकल्स, फार्मास्युटिकल्स इंटरमीडिएट आणि एफएमसीजी केमिकल्सचे उत्पादन करते. पुण्याच्या या कंपनीचे ग्राहक भारतासह चीन, युरोप, अमेरिका, तैवान, दक्षिण कोरिया जपान सारख्या देशांमध्ये आहेत. कंपनीला दोन तृतियांश महसूल हा निर्यातीतून मिळतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 08:35 AM2021-07-03T08:35:01+5:302021-07-03T08:38:42+5:30

Clean Science IPO: क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी ही कंपनी विशेष रासायनिक परफॉर्मेंस केमिकल्स, फार्मास्युटिकल्स इंटरमीडिएट आणि एफएमसीजी केमिकल्सचे उत्पादन करते. पुण्याच्या या कंपनीचे ग्राहक भारतासह चीन, युरोप, अमेरिका, तैवान, दक्षिण कोरिया जपान सारख्या देशांमध्ये आहेत. कंपनीला दोन तृतियांश महसूल हा निर्यातीतून मिळतो.

Money tips: A chance to make a lot of money on July 7; Pune's Clean Science and Technology Company launches IPO | Money tips: ७ जुलैला येतेय बक्कळ कमाई करण्याची संधी; IPO लाँच करतेय पुण्याची बडी कंपनी...

Money tips: ७ जुलैला येतेय बक्कळ कमाई करण्याची संधी; IPO लाँच करतेय पुण्याची बडी कंपनी...

केमिकल कंपनी क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी (Clean Science and Technology) ने 1,546.62 कोटींच्या आयपीओसाठी प्रति शेअर 880 ते 890 एवढे मुल्य निर्धारित केले आहे. पुण्याच्या या कंपनीचा आयपीओ 7 जुलैला खुला होणार आहे, तर 9 जुलैला बंद होणार आहे. कंपनीने शुक्रवारी याची घोषणा केली आहे. (Clean Science IPO: Specialty chemicals maker to launch issue on July 7, price band fixed at Rs 880-900)

यानुसार अँकर गुंतवणूकदार 6 जुलै रोजीच शेअरची बोली लावू शकणार आहेत. कंपनीचा 1,546.62 कोटी रुपयांचा संपूर्ण आयपीओ हा सध्याचे प्रवर्तक आणि शेअरधारकांकडून विक्रीच्या स्वरूपात (ओएफएस) मध्ये असणार आहे. ओएफएसद्वारे अनंतरूप फाइनेंशियल एडवाइजरी सर्विसेज, अशोक रामनारायण बूब, कृष्णकुमार रामनारायण बूब, सिद्धार्थ अशोक सिकची उर्फ पार्थ अशोक महाश्वेरी यांच्याकडून शेअर उपलब्ध केले जाणार आहेत. 

यापैकी निम्मे शेअर हे संस्थात्मक खरेदीदार (क्यूआयबी) साठी आरक्षित असणार आहेत. तसेच 35 टक्के घाऊक गुंतवणूकदार आणि 15 टक्के गैर संस्थात्मक खरेदीदारांसाठी आरक्षित असणार आहेत. 

क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी ही कंपनी विशेष रासायनिक परफॉर्मेंस केमिकल्स, फार्मास्युटिकल्स इंटरमीडिएट आणि एफएमसीजी केमिकल्सचे उत्पादन करते. 
पुण्याच्या या कंपनीचे ग्राहक भारतासह चीन, युरोप, अमेरिका, तैवान, दक्षिण कोरिया जपान सारख्या देशांमध्ये आहेत. कंपनीला दोन तृतियांश महसूल हा निर्यातीतून मिळतो.

Web Title: Money tips: A chance to make a lot of money on July 7; Pune's Clean Science and Technology Company launches IPO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.