Lokmat Money > बिझनेस न्यूज > UPI Transaction: UPI द्वारे चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झालेत? टेन्शन घेऊ नका, या पद्धधतीनं मिळतील परत

UPI Transaction: UPI द्वारे चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झालेत? टेन्शन घेऊ नका, या पद्धधतीनं मिळतील परत

मोबाईल नंबरचा एक अंकही चुकीचा असेल तर पैसे चुकीच्या खात्यात ट्रान्सफर होऊ शकतात. पण आता घाबरण्याची गरज नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 11:59 AM2023-10-07T11:59:44+5:302023-10-07T12:01:27+5:30

मोबाईल नंबरचा एक अंकही चुकीचा असेल तर पैसे चुकीच्या खात्यात ट्रान्सफर होऊ शकतात. पण आता घाबरण्याची गरज नाही.

Money transferred to wrong account through UPI Don t take tension you will get back with this method know procedure | UPI Transaction: UPI द्वारे चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झालेत? टेन्शन घेऊ नका, या पद्धधतीनं मिळतील परत

UPI Transaction: UPI द्वारे चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झालेत? टेन्शन घेऊ नका, या पद्धधतीनं मिळतील परत

UPI Payment : आता UPI पेमेंट भारतात खूप सामान्य झाले आहे. लहान शहरांपासून ते मोठ्या शहरांच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत Google Pay, PhonePe सारख्या UPI प्लॅटफॉर्म आणि पेटीएम सारख्या अॅप्सद्वारे व्यवहार केले जात आहेत. मोबाईल क्रमांकाने UPI व्यवहार करणे सोपे आहे. पण मोबाईल नंबरचा एक अंकही चुकीचा असेल तर पैसे चुकीच्या खात्यात ट्रान्सफर होऊ शकतात. तुमच्यासोबत अशी घटना घडली असेल तर घाबरण्याची गरज नाही. तुम्ही चुकून ट्रान्सफर केलेले पैसे परत (How To Reverse Upi Transaction) मिळवू शकता. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

जर तुम्ही कधीही चुकीचा UPI व्यवहार केला तर प्रथम तुमच्या बँकेच्या कस्टमर केअर विभागाशी संपर्क साधा. याशिवाय तुम्ही UPI सर्व्हिस प्रोव्हायडरशी देखील संपर्क साधू शकता. यामध्ये तुम्हाला व्यवहाराची तारीख, वेळ, रक्कम इत्यादी सारखी अनेक माहिती द्यावी लागेल.

योग्य माहिती देणं आवश्यक?
तुम्हाला ग्राहक सेवा अधिकाऱ्याला संपूर्ण माहिती द्यावी लागेल. ज्यामध्ये तुम्हाला रिव्हर्स ट्रान्झॅक्शनसाठी संपूर्ण कारण द्यावं लागेल. तुमचा चुकीचा व्यवहार कसा झाला हे तुम्हाला सांगावे लागेल. तुम्ही दिलेल्या माहितीनुसार समस्येचं मूल्यांकन केलं जाईल.
तुम्हाला बँक किंवा UPI सर्व्हिस प्रोव्हायडरनं सांगितलेल्या सर्व बाबींचं पालन करावं लागेल. योग्य वेळी तक्रार केल्यास समस्याही वेळेवर दूर होईल. सर्व माहिती दिल्यानंतर, यूपीआय सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा बँकेद्वारे त्याचा तपास केला जाईल. सर्व माहिती बरोबर आढळल्यास तुमचे पैसे परत केले जातील.

दिली जाणार माहिती
तुमच्या खात्यात कोणतेही चुकीचे व्यवहार होणार नाहीत याची बँक खात्री करेल. यासाठी खातेदाराला UPI सर्व्हिस प्रोव्हाडर किंवा बँकेकडून लेखी माहिती दिली जाईल. त्यानंतरच पैसे तुमच्या खात्यात परत पाठवले जातील. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही वेळ लागू शकतो. कारण सर्व माहितीची पडताळणी केली जाईल आणि पडताळणी केल्यानंतरच ट्रान्झॅक्शन रिव्हर्स होईल.

Web Title: Money transferred to wrong account through UPI Don t take tension you will get back with this method know procedure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.