Lokmat Money > बिझनेस न्यूज > सरकारकडून 35 टक्के अनुदान घेऊन करू शकता 'हा' व्यवसाय, दरमहा 1 लाखांपर्यंत होईल कमाई!

सरकारकडून 35 टक्के अनुदान घेऊन करू शकता 'हा' व्यवसाय, दरमहा 1 लाखांपर्यंत होईल कमाई!

आज आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाबद्दल सांगत आहोत, जो तुम्ही सरकारी मदत घेऊन सुरू करू शकता आणि दर महिन्याला मोठी कमाई करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 11:22 AM2022-11-08T11:22:39+5:302022-11-08T11:24:12+5:30

आज आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाबद्दल सांगत आहोत, जो तुम्ही सरकारी मदत घेऊन सुरू करू शकता आणि दर महिन्याला मोठी कमाई करू शकता.

money you can get rs 2 lakh insurance benefits just in 12 rupees check know how | सरकारकडून 35 टक्के अनुदान घेऊन करू शकता 'हा' व्यवसाय, दरमहा 1 लाखांपर्यंत होईल कमाई!

सरकारकडून 35 टक्के अनुदान घेऊन करू शकता 'हा' व्यवसाय, दरमहा 1 लाखांपर्यंत होईल कमाई!

नवी दिल्ली : तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा (Start own business)  विचार करत असाल, तर तुम्ही कृषी क्षेत्रात तुमचे नशीब आजमावू शकता. या क्षेत्रात फायदेशीर व्यवसायाची  (Profitable business) हमी दिली जाते. आज आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाबद्दल सांगत आहोत, जो तुम्ही सरकारी मदत घेऊन सुरू करू शकता आणि दर महिन्याला मोठी कमाई करू शकता.

तुम्ही कुक्कुटपालन व्यवसाय (Poultry Farming) करू शकता. हा व्यवसाय किमान 5 ते 9 लाख रुपयांपासून सुरू करता येतो. जर तुम्ही लहान स्तरापासून म्हणजे 1500 कोंबड्यांपासून लेयर फार्मिंग सुरू केले, तर तुम्हाला महिन्याला 50 हजार ते 1 लाख रुपये मिळू शकतात.

किती खर्च येईल?
कुक्कुटपालनासाठी तुम्हाला सर्वात आधी जागा शोधावी लागेल. यानंतर पिंजरा आणि उपकरणे यासाठी जवळपास 5 ते 6 लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. 1500 कोंबड्यांचे टार्गेट ठेवून काम सुरू करायचे असेल तर 10 टक्के जास्त कोंबड्या खरेदी कराव्या लागतील. दरम्यान, या व्यवसायात तुम्ही अंड्यांमधूनही भरपूर कमाई कराल. देशात अंड्याचे भाव वाढू लागले आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही ते विकून भरपूर कमाई करू शकता.

कोंबडी खरेदी करण्यासाठी 50 हजार रुपयांचे बजेट
लेयर पॅरेंट बर्डची किंमत सुमारे 30 ते 35 रुपये आहे. म्हणजेच कोंबडी खरेदी करण्यासाठी 50 हजार रुपयांचे बजेट ठेवावे लागणार आहे. आता त्यांना वाढवण्यासाठी विविध प्रकारचे अन्न द्यावे लागते आणि औषधांवरही खर्च करावा लागतो.

एका वर्षात 30 लाखांपर्यंत कमाई
सलग 20 आठवडे कोंबड्यांना आहार देण्यासाठी जवळपास 1 ते 1.5 लाख रुपये खर्च येतो. एक लेयर पॅरेंट बर्ड एका वर्षात जवळपास 300 अंडी घालतो. 20 आठवड्यांनंतर कोंबड्या अंडी घालण्यास सुरवात करतात आणि वर्षभर अंडी घालतात. 20 आठवड्यांनंतर त्यांच्या खाण्यापिण्यावर सुमारे 3 ते 4 लाख रुपये खर्च होतात. अशा परिस्थितीत 1500 कोंबड्यांपासून वर्षाला सरासरी 290 अंडी मिळून सुमारे 4,35,000 अंडी मिळतात. वाया गेल्यानंतरही 4 लाख अंडी विकता येत असतील तर एक अंडे 5 रुपये 7 रुपये दराने घाऊक दराने विकले जाते. म्हणजेच फक्त एका वर्षात अंडी विकून तुम्ही भरपूर कमाई करू शकता.

सरकार देईल 25 टक्के अनुदान 
पोल्ट्री फार्म व्यवसाय कर्जावरील अनुदान सुमारे 25 टक्के आहे. त्याच वेळी, एससी एसटी वर्गाला प्रोत्साहन देण्यासाठी हे अनुदान 35 टक्क्यांपर्यंत असू शकते. आम्ही तुम्हाला सांगतो की, या व्यवसायाची खासियत म्हणजे यामध्ये काही रक्कम गुंतवावी लागेल आणि उर्वरित रक्कम बँकेकडून कर्ज मिळेल.

Web Title: money you can get rs 2 lakh insurance benefits just in 12 rupees check know how

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.