Join us

Moody's India Rating: मूड बदलला! देशाच्या अर्थव्यस्थेसाठी आनंदाची बातमी; निगेटिव्हमधून आली बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2021 10:48 PM

Moody's India Rating change: अमेरिकी रेटिंग एजन्सीने फेब्रुवारीमध्ये 2021-22साठी भारताचा आर्थिक विकास दर 13.7 राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. अधिकृत अंदाजानुसार 2020-21 भारतीय अर्थव्य़वस्था 8 टक्क्यांनी खुंटली आहे. 

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक चांगली बातमी आली आहे. मूडीजने भारताची रेटिंग निगेटिव्हवरून स्थिर अशी केली आहे. याचबरोबर बीएए3 (BAA3) रेटिंगदेखील तशीच ठेवण्यात आली आहे. याआधी मे मध्ये मूीजने मे महिन्यामध्ये भारताची रेटिंग घटवून निगेटिव्ह बीएए3 (BAA3) केली होती. तेव्हा मूडीजने म्हटले होते की, आर्थिक वाढीच्या रस्त्यामध्ये अडचणी आणि उच्च ऋण व कमजोर आर्थिक प्रणालीचा परिणाम होत आहे. (Moody's Revises India's Rating Outlook From Negative to Stable)

अमेरिकी रेटिंग एजन्सीने फेब्रुवारीमध्ये 2021-22साठी भारताचा आर्थिक विकास दर 13.7 राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. अधिकृत अंदाजानुसार 2020-21 भारतीय अर्थव्य़वस्था 8 टक्क्यांनी खुंटली आहे. 

मूडीजने म्हटले होते की, भारत कोरोनाच्या दुसऱ्या भीषण लाटेचा सामना करत आहे. यामुळे पुढील काळात आर्थिक सुरधारणा ही धीमी आणि दीर्घ कालावधीच्या विकासाच्या गतीला कमी करू शकतो. कोरोना संक्रमणामुळे नवीन रुगांची वाढ वेगाने होत आहे. य़ामुळे आरोग्य व्यवस्था आणि उपचारांसाठीचा पुरवठा कमी पडला आहे. 

टॅग्स :अर्थव्यवस्था