गेल्या वर्षी जवळपास पाच-सहा महिने कोरोना प्रकोपामुळे लॉकडाऊन (corona lockdown) झेलल्यानंतर देश पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या विळख्यात सापडू लागला आहे. अशातच एक मोठी दिलासा देणारे वृत्त आले आहे. देशाची अर्थव्यवस्था सुधारत असल्याचे हे संकेत असून जागतिक दर्जाची रेटिंग एजन्सी मुडीजने (Moody's) 2021-22 मध्ये देशाची अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर हा 13.7 टक्क्यांवर जाण्याची शक्यता वर्तविली आहे. (Rating agency Moody's on Thursday upped India's growth projection for the next financial year, beginning 1 April, to 13.7% from 10.8% estimated earlier.)
मुडीजने भारताचा आर्थिक विकास दर हा 10.08% राहणार असल्याचा अंदाज आधी वर्तविला होता. मात्र, फेब्रुवारी 2021 मध्ये पुन्हा यावर अभ्यास करून हा दर 13.7 टक्क्यांवर जाण्याचा अंदाज सांगितला आहे. मुडीजने केवळ पुढील आर्थिक वर्षाचे अंदाज बदलले नाहीत तर भारताचा चालू आर्थिक वर्षातील जीडीपी हा 7 टक्क्यांवरच राहणार असल्याचे म्हटले आहे. आधीच्या अंदाजात मुडीजने हेच उद्दिष्ट 10.6% असेल असे म्हटले होते.
मुडीजने ‘ग्लोबल मॅक्रो आऊटलूक 2021-22' च्या फेब्रुवारी आवृत्तीमध्ये सांगितले की, या वर्षाच भारताने सर्वात कडक लॉकडाऊन झेलले. यामुळे दुसऱ्या तिमाहीमध्ये तिथे अर्थव्यवस्थेत मोठी घसरण पहायला मिळाली. आता अर्थव्यवस्था हळूहळू वेग पकडू लागली आहे. 2020 च्या अखेरीस भारताने आधीचा विकास दर गाठला आहे.
उद्या येणार जीडीपीचे आकडे
केंद्र सरकार चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीचा जीडीपी उद्या जाहीर करणार आहे. बहुतांश रेटिंग एजन्सींनी तिसऱ्या तिमाहीत भारताचा आर्थिक विकास दर हा विक्रमीरित्या पॉझिटीव्ह झोनमध्ये राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे उद्याचा दिवस भारताच्य़ा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाचा आहे.