Lokmat Money > बिझनेस न्यूज > चंद्र, सूर्य अन् तारे... रोजगार देतील सारे, ‘स्पेस स्टार्टअप’ला मिळाली गती

चंद्र, सूर्य अन् तारे... रोजगार देतील सारे, ‘स्पेस स्टार्टअप’ला मिळाली गती

संशोधन संस्था ‘ट्रॅक्शन’ने जारी केलेल्या अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षात स्पेस स्टार्ट अप्समध्ये गुंतवणूक वाढली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 08:19 AM2023-08-31T08:19:54+5:302023-08-31T08:20:16+5:30

संशोधन संस्था ‘ट्रॅक्शन’ने जारी केलेल्या अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षात स्पेस स्टार्ट अप्समध्ये गुंतवणूक वाढली आहे.

Moon, sun and stars... all will provide employment, 'space startup' has gained momentum | चंद्र, सूर्य अन् तारे... रोजगार देतील सारे, ‘स्पेस स्टार्टअप’ला मिळाली गती

चंद्र, सूर्य अन् तारे... रोजगार देतील सारे, ‘स्पेस स्टार्टअप’ला मिळाली गती

चेन्नई : चंद्रयान-३ च्या यशामुळे भारताच्या अवकाश क्षेत्रातील स्टार्टअप कंपन्यांमध्ये होणाऱ्या गुंतवणुकीस गती मिळणार आहे. भारताच्या अंतराळ मोहिमांमुळे ‘स्पेस स्टार्टअप’ कंपन्यांना मागील काही वर्षांत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चंद्रयान-३ नंतर त्यात आणखी वाढ होईल, असे एका अभ्यासात आढळून आले आहे. 

संशोधन संस्था ‘ट्रॅक्शन’ने जारी केलेल्या अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षात स्पेस स्टार्ट अप्समध्ये गुंतवणूक वाढली आहे. या अहवालात म्हटले आहे की, गुंतवणुकीतील वाढीबरोबरच अवकाश क्षेत्रातील गुंतवणुकीचा सरासरी आकारही २०२० मधील २.८ दशलक्ष डॉलरवरून वाढून २०२३ मध्ये १५ दशलक्ष डॉलर झाला आहे. या क्षेत्रात पूर्वी केवळ सरकारलाच गुंतवणुकीची परवानगी होती. २०२० मध्ये हे क्षेत्र खाजगी गुंतवणुकीसाठी खुले झाले. (वृत्तसंस्था) 

‘चंद्र बाजार’ही झेपावणार
सल्ला संस्था ‘पीडब्ल्यूसी’च्या विश्लेषणानुसार, जगातील अनेक बडे देशही मोठ्या प्रमाणावर चंद्र मोहिमा आखत आहेत. त्यामुळे ‘चंद्र बाजार’ (ल्युनार मार्केट) झपाट्याने वाढेल. २०४० पर्यंत ‘चंद्र बाजार’ १७० अब्ज डॉलरचा टप्पा पार करेल.

Web Title: Moon, sun and stars... all will provide employment, 'space startup' has gained momentum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी