Lokmat Money > बिझनेस न्यूज > Wipro नंतर आणखी एका कंपनीत Moonlighting करताना पकडले गेले कर्मचारी, नोकरी गमावली!

Wipro नंतर आणखी एका कंपनीत Moonlighting करताना पकडले गेले कर्मचारी, नोकरी गमावली!

मूनलाइटनिंग (Moonlighting) म्हणजे एक नोकरी करत असतानाच दुसरी नोकरी करणं किंवा एकाच वेळी दोन कंपन्यांसाठी काम करणं. या मुद्द्यावरुन गेल्या काही महिन्यांपासून जोरदार चर्चा सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 08:41 PM2022-10-24T20:41:17+5:302022-10-24T20:42:47+5:30

मूनलाइटनिंग (Moonlighting) म्हणजे एक नोकरी करत असतानाच दुसरी नोकरी करणं किंवा एकाच वेळी दोन कंपन्यांसाठी काम करणं. या मुद्द्यावरुन गेल्या काही महिन्यांपासून जोरदार चर्चा सुरू आहे.

moonlighting unacceptable in happiest minds company caught some employees got fired | Wipro नंतर आणखी एका कंपनीत Moonlighting करताना पकडले गेले कर्मचारी, नोकरी गमावली!

Wipro नंतर आणखी एका कंपनीत Moonlighting करताना पकडले गेले कर्मचारी, नोकरी गमावली!

नवी दिल्ली-

मूनलाइटनिंग (Moonlighting) म्हणजे एक नोकरी करत असतानाच दुसरी नोकरी करणं किंवा एकाच वेळी दोन कंपन्यांसाठी काम करणं. या मुद्द्यावरुन गेल्या काही महिन्यांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. नुकतंच आयटी सेक्टरमधील दिग्गज कंपनी 'विप्रो'ला (Wipro) एक नव्हे, दोन जवळपास ३०० कर्मचारी एकाचवेळी दोन कंपन्यांसाठी काम करताना आढळून आले. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांना विप्रोनं बाहेरचा रस्ता दाखवला. आता आणखी एका आयटी कंपनीनं अशीच कारवाई केली आहे. आयटी कंपनी हॅप्पीएस्ट माइंडनं (Happiest Minds) काही कर्मचाऱ्यांना मूनलाइटनिंगसाठी नोकरीवरुन काढलं आहे. 

एका वर्षात अनेक कर्मचाऱ्यांवर कारवाई
पीटीआयच्या रिपोर्टनुसार, आयटी सेक्टरमधील कंपनी हॅप्पीएस्ट माइंड टेक्नोलॉजीनं मूनलाइटनिंगच्या आरोपाखाखील कडक कारवाई केली आहे. "कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी दोन संस्थांमध्ये काम करणं अजिबात मान्य नाही. हे नोकरीच्या नियमांचं उल्लंघन करणारं आहे", असं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. कंपनीनं गेल्या ६ ते १२ महिन्यांत अशा पद्धतीनं काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं आहे. 

कंपनीनं जाहीर केली नाही कर्मचाऱ्यांची संख्या
कंपनीनं Moonlighting करताना पकडल्यामुळे नोकरीवरुन काढलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या अद्याप स्पष्ट केलेली नाही. Moonlighting ही पॉलिसी प्रचलित नाही आणि जे कर्मचारी असं करताना पकडले गेले आहेत त्यांना तत्काळ नोकरीवरुन काढून टाकलं आहे, असं कंपनीनं निवेदनात म्हटलं आहे. हॅप्पीएस्ट माइंड कंपनीत ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत काम करणाऱ्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ४,५८१ इतकी होती. तर चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहित (जुलै-सप्टेंबर) कंपनीला एकूण ३३.७ टक्के नफा झाला आहे.

Web Title: moonlighting unacceptable in happiest minds company caught some employees got fired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.