बंगळुरू : भारतातील सर्वांत मोठी सॉफ्टवेअर कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) वित्त वर्ष २0१७मध्ये आपल्या ९१ अधिकाऱ्यांना १ कोटीपेक्षा जास्त वेतन दिले. इन्फोसिस आणि विप्रो या स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत टीसीएसच्या कोट्यधीश अधिकाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या अधिक आहे. टीसीएसच्या ९१पैकी २२ कोट्यधीश अधिकाऱ्यांनी आपले संपूर्ण करिअर कंपनीच्या मुंबई येथील मुख्यालयात घालविले आहे. इन्फोसिसच्या कोट्यधीश अधिकाऱ्यांची संख्या ५१ तर विप्रोच्या कोट्यधीश अधिकाऱ्यांची संख्या ६१ आहे.
टीसीएसच्या ९१ जणांना १ कोटीपेक्षा जास्त वेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 1:43 AM