Lokmat Money > बिझनेस न्यूज > राज्यातील ४५००हून अधिक उद्योग सुरू

राज्यातील ४५००हून अधिक उद्योग सुरू

राज्यातील उद्योग अंशत: पुन्हा सुरू होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. आतापर्यंत राज्यातील ४५००हून अधिक उद्योग सुरू झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 03:29 AM2020-04-30T03:29:13+5:302020-04-30T03:29:42+5:30

राज्यातील उद्योग अंशत: पुन्हा सुरू होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. आतापर्यंत राज्यातील ४५००हून अधिक उद्योग सुरू झाले आहेत.

More than 4500 industries started in the state | राज्यातील ४५००हून अधिक उद्योग सुरू

राज्यातील ४५००हून अधिक उद्योग सुरू

मुंबई : कोरोनास प्रतिबंध म्हणून लागू केलेल्या लॉकडाउनमध्ये राज्यातील उद्योग अंशत: पुन्हा सुरू होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. आतापर्यंत राज्यातील ४५००हून अधिक उद्योग सुरू झाले आहेत.
लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील अत्यावश्यक सेवांचे उत्पादन करणाऱ्या व निरंतर प्रक्रिया उद्योग घटकांना उत्पादनासाठी मंजुरी देण्यात आलेली होती. एकूण १९६६ उद्योगांना तर निरंतर उद्योग प्रक्रियेतील १५६ उद्योगांना या अंतर्गत मंजुरी देण्यात आली होती.
लॉकडाउनच्या दुसºया टप्प्यात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद व नागपूर यांसह ३६ जिल्ह्यांतून उद्योग सुरू करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर २८ एप्रिलपर्यंत एकूण १५,८४६ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी सुमारे ४५०० पेक्षा अधिक उद्योगांनी उत्पादन सुरू केले आहे. या उद्योगांमध्ये ९६ हजारांपेक्षा अधिक मनुष्यबळ कार्यरत झाले आहे. राज्यात सुरू झालेल्या उद्योगांमध्ये प्रामुख्याने जेएसडब्ल्यू, सीएट, केईसी, पोस्को स्टील, सुदर्शन केमिकल्स, अंबुजा सिमेंट, अल्ट्राटेक, हिंदुस्थान लिव्हर या मोठ्या उद्योग समूहांचा समावेश आहे. (वा.प्र.)

Web Title: More than 4500 industries started in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.