Join us

अनुभव असलेल्यांना नोकऱ्यांच्या जादा संधी, AI जाणकारास जबरदस्त मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 10:36 IST

एआय आणि मशिन लर्निंग या क्षेत्रातील व्यावसायिकांना मागणी जबरदस्त वाढली आहे. जाणून घ्या अधिक माहिती.

देशात पांढरपेशा (व्हॉइट कॉलर) नोकऱ्यांत एप्रिल २०२४ च्या तुलनेत मेमध्ये ६ टक्के वाढ झाली आहे. अनुभवी लोकांसाठी नोकऱ्यांच्या संधीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे, तसेच एआय आणि मशिन लर्निंग या क्षेत्रातील व्यावसायिकांना मागणी जबरदस्त वाढली आहे. 

पांढरपेशा रोजगारांतील चढउतार नोंदवणारा 'नोकरी जॉबस्पीक निर्देशांक' एप्रिल २०२४ मध्ये मेच्या तुलनेत ६ टक्के वाढला. मे २०२३ च्या तुलनेत मात्र निर्देशांक २ टक्के घसरून २७९९ वर आला आहे. आयटी (० टक्के), बीपीओ (-३ टक्के) आणि शिक्षण (-५ टक्के) या क्षेत्रांवरील दबाव कायम असल्याचे दिसून आले. 

तेल, गॅस व वीज क्षेत्रांत नोकऱ्या वार्षिक आधारावर १४ टक्के वाढल्या. या क्षेत्रात १३ ते १६ वर्षे अनुभव असलेल्या उमेदवारांची मागणी वाढली. एफएमसीजी क्षेत्रातील नोकऱ्यांत १७ टक्के वाढ झाली. ग्राहकांचा बदलता कल, शहरीकरणातील वाढ आणि ई- कॉमर्सचा विस्तार यामुळे वृद्धीला गती मिळाली. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मशिन लर्निंग गुणवत्तेची मागणी वाढत आहे. या क्षेत्रातील नोकऱ्यांत ३७ टक्के वाढ झाली.

टॅग्स :नोकरीआर्टिफिशिअल इंटेलिजन्स