नवी दिल्ली : येत्या १ जून २०२२ पासून दुचाकी आणि चारचाकी वाहनांसह अन्य मोठ्या वाहनांचा थर्ड पार्टी विमा महाग होणार आहे. त्यासाठी गाडी मालकांना आता अधिक हप्ता भरावा लागेल. भारतीय विमा नियामकीय व विकास प्राधिकरणाने विम्याचे दर वाढविण्यास परवानगी दिली आहे.नव्या नियमानुसार, एक हजार सीसीच्या खासगी कारचा थर्ड पार्टी विम्याचा दर २,०९४ रुपये करण्यात आला आहे. १,००० ते १,५०० सीसीच्या खासगी कारसाठीचा दर ३,४१६ रुपये करण्यात आला आहे. १,५०० सीसीच्या वरच्या गाड्यांचा थर्ड पार्टी विमा ७,८९० रुपयांवरून ७,९९७ रुपये करण्यात आला आहे.
वाहन नवा प्रीमियम
१५० सीसी ते ३५० सीसी दुचाकी ₹१,३६६
एक हजार सीसीची खासगी कार ₹२,०९४
१,००० ते १,५०० सीसी खासगी कार ₹३,४१६
१,५०० सीसीच्या वरच्या गाड्या ₹७,९९७
३५० सीसीपेक्षा मोठ्या दुचाकी ₹२,८०४
खासगी इलेक्ट्रिक वाहन (३० किलोवॅट) ₹५,५४३
३० ते ६५ किलोवॅट क्षमतेची ईव्ही ₹९,०४४
मोठ्या ईव्हीसाठी (३ वर्षे) ₹२०,९०७
३ किलो वॅटच्या ईव्ही दुचाकी ₹२,४६६
३ ते ७ किलोवॅटच्या ईव्ही ₹३,२७३
७ ते १६ किलो वॅटच्या ईव्ही ₹६,२६०
१६ किलो वॅटपेक्षा अधिकच्या ईव्ही ₹१२,८४९
थर्ड पार्टी विमा नसल्यास तिसऱ्या व्यक्तीला भरपाई देण्याची जबाबदारी वाहनमालक व चालक यांच्यावर असते.