देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओकडे (Reliance Jio) वर्षभर (365 Days) चालणारे 4 रिचार्ज प्लॅन्स आहेत. या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 1.5GB ते 3GB डेटा मिळतो. आम्ही रिलायन्स जिओच्या 2 वार्षिक रिचार्ज प्लॅन्सची तुलना केली आहे. Jio च्या रिचार्ज प्लॅनमध्ये 120 रुपये कमी खर्च करूनही तुम्ही 170GB अधिक डेटा कसा मिळवू शकता हे आपण पाहणार आहोत. आम्ही Jio च्या 2999 रुपये आणि 3119 रुपयांच्या प्लॅन्सची तुलना केली आहे.
2999 रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओच्या 2999 रुपयांच्या प्लॅनमध्ये 365 दिवसांची म्हणजेच एका वर्षाची वैधता उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये दररोज 2.5GB डेटा दिला जातो. म्हणजेच प्लॅनमध्ये एकूण 912.5GB डेटा उपलब्ध आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये कोणत्याही अन्य नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळतो. प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा देण्यात आली आहे. म्हणजेच या प्लॅनमध्ये 36500 एसएमएस पाठवले जाऊ शकतात. याशिवाय प्लानमध्ये जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते.
3119 रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओचा 3119 रुपयांचा रिचार्ज देखील एक वार्षिक प्लॅन आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा दिला जातो. याशिवाय 10GB अतिरिक्त डेटाही मिळतो. म्हणजेच Jio च्या या प्लानमध्ये वर्षभर 740GB डेटा मिळतो. प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएसची सुविधाही दिली जाते. म्हणजेच तुम्ही एका वर्षात 36500 एसएमएस पाठवू शकता. याशिवाय या प्लॅनमध्ये Disney+ Hotstar चं मोबाईल सबस्क्रिप्शन 1 वर्षासाठी देण्यात येते. तसेच Jio अॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील यामध्ये उपलब्ध आहे.
जर तुम्ही Jio च्या 2999 रुपयांच्या आणि 3119 रुपयांच्या प्लॅनची तुलना केली, तर 2999 रुपयांच्या प्लॅनमध्ये 120 रुपये कमी खर्च करून अधिक डेटा मिळतो. 2999 रुपयांच्या प्लॅनमध्ये 3119 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनपेक्षा 172.5GB अधिक डेटा मिळतो. तथापि, या दोन प्लॅनमधील एक प्रमुख फरक म्हणजे 3,119 ची योजना Disney + Hotstar चे एका वर्षांचे सबस्क्रिप्शन मिळते. तर 2999 रुपयांच्या प्लॅनमध्ये हा लाभ दिला जात नाही.