लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशात आणि जगातील वाढत्या सायबर गुन्ह्यांमध्ये अतिशय साधा पासवर्ड हे सर्वात मोठा धोका ठरतो असून, लाखो रुपये खात्यातून आरामात वळते केले जात आहेत.
देशातील प्रत्येक शहरी नोकरदार व्यक्ती सरासरी १० ते १५ पासवर्ड वापरते. नॉर्डपास २०२२ च्या अभ्यासानुसार, पासवर्ड विसरण्याच्या भीतीने लोक बहुतेक ॲप्समध्ये समान पासवर्ड किंवा अगदी साधा पासवर्ड निवडत असून, ते सायबर गुन्हेगारांना बळी पडत आहेत. दररोज ३० कोटींहून अधिक वेबसाईट हॅक केल्या जात असून, दरवर्षी सुमारे ६ ट्रिलियन डॉलरचे नुकसान होत आहे. जगभरातील ७२ टक्क्यांहून अधिक, तर भारतात ८४ टक्क्यांपेक्षा अधिकजण सोपे पासवर्ड किंवा निष्काळजीपणामुळे सायबर गुन्हेगारांच्या तावडीत सापडले आहेत. महिला पुरुषांपेक्षा ७ टक्के मजबूत पासवर्ड वापरत असून, सायबर हल्ल्यांना ८ टक्के कमी बळी पडत असल्याचे समोर आले आहे.
महिला सावध, पुरुष बेफिकीरअभ्यासानुसार, जगभरातील ४३ टक्के महिला ऑनलाईन स्टोअर, ५७ टक्के बँका, ५० टक्के खासगी ई-मेल आणि ३८ टक्के मोबाईल ॲप्समध्ये मजबूत पासवर्ड वापरतात. यामुळेच महिला सायबर हल्ल्यांना कमी बळी पडतात. त्याचवेळी, ३६ टक्के पुरुष ऑनलाईन स्टोअरमध्ये, ५० टक्के बँका आणि इतर आर्थिक खात्यांमध्ये, ४२ टक्के खासगी ई-मेलमध्ये आणि ३१ टक्के मोबाइल ॲप्समध्ये भक्कम पासवर्ड वापरतात.
कोणता पासवर्ड सुरक्षित?कोणताही अर्थ नसलेला पासवर्ड शोधणे खूप अवघड आहे. म्हणून, शब्दकोषातील शब्द किंवा कीबोर्डवरील क्रमाने असलेली अक्षरे वापरू नका. पासवर्ड लक्षात ठेवण्यासाठी कंपनीच्या नावाच्या शेवटी चार शब्द टाका, म्हणजे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचा पासवर्ड लक्षात राहतो. पासवर्डमध्ये अंकांसह इतर अक्षरे असावीत, असा प्रयत्न केला पाहिजे.- व्ही. राजेंद्रन, अध्यक्ष, डिजिटल सुरक्षा असोसिएशन ऑफ इंडिया
२५ ते ३० वर्षे वयोगटातील लोक पासवर्डबाबत अधित चिंतीत असतात.१८ ते २४ वर्षांतील मुले ही पासवर्ड सुरक्षा आणि हॅकिंगमुळे होणारे नुकसान याबाबत बेजबाबदार असतात.२५ ते ३४ वर्षे वयातील लोक होणाऱ्या नुकसानीबाबत अधिक चिंतीत असतात.
१५अब्ज पेक्षा अधिक पार्सवर्डचा वापर जगभरात केला जातो.२.२अब्ज म्हणजेच ७ टक्के पासवर्ड हे युनिक असतात.
जगभरातील प्रसिद्ध पासवर्ड१२३४५६ १२३४५६७८९ qwerty १२३४ querty१२३ १q२w३e ११११११
पॉर्न स्टार, मित्र, शत्रूच्या नावानेही पासवर्डजगात ५० प्रकारचे पासवर्ड अधिक वापरले जातात. हे पासवर्ड सीईओ, अधिकारी, कर्मचारी, मॅनेजर आणि कंपन्यांचे मालकही वापरतात. लोक पाळीव प्राणी, पत्नी, मुले, प्रेमिका, पॉर्न स्टार, मित्र, शत्रू यांच्या नावाशिवाय अनेक अश्लील शब्दांचेही पासवर्ड बनवतात.