Lokmat Money > बिझनेस न्यूज > जगातील 410 अब्जाधीशांपेक्षा जास्त Apple ची कमाई, तीन महिन्यात 16,45,42,68,46,000 रुपयांचा नफा

जगातील 410 अब्जाधीशांपेक्षा जास्त Apple ची कमाई, तीन महिन्यात 16,45,42,68,46,000 रुपयांचा नफा

अॅपलने आपले तिमाही निकाल जाहीर केले असून, यात रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 05:43 PM2023-08-04T17:43:29+5:302023-08-04T17:44:18+5:30

अॅपलने आपले तिमाही निकाल जाहीर केले असून, यात रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

More than 410 billionaires in the world, Apple earns Rs 16,45,42,68,46,000 in three months | जगातील 410 अब्जाधीशांपेक्षा जास्त Apple ची कमाई, तीन महिन्यात 16,45,42,68,46,000 रुपयांचा नफा

जगातील 410 अब्जाधीशांपेक्षा जास्त Apple ची कमाई, तीन महिन्यात 16,45,42,68,46,000 रुपयांचा नफा

Apple ही जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक आहे. नुकताच अॅपलने तिमाही निकाल जाहीर केला आहे. यावेळी अॅपलने फक्त तीन महिन्यांत $19.88 बिलियन म्हणजेच सूमारे 16,45,42,68,46,000 रुपयांची कमाई केली आहे. हा आकडा मागील वर्षी याच कालावधीत कमावलेल्या नफ्यापेक्षा 2 टक्के अधिक आहे. 

आश्चर्याची बाब म्हणजे कंपनीने नोंदवलेला हा नफा जगातील 400 हून अधिक अब्जाधीशांच्या संपत्तीपेक्षाही जास्त आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, देशातील 500 अब्जाधीशांपैकी 89 अब्जाधीशांची संपत्ती 20 अब्ज डॉलर्स किंवा त्याहून अधिक आहे, तर उर्वरित अब्जाधीशांची संपत्ती अॅपलच्या नफ्यापेक्षाही कमी आहे. 

भारतात चांगली कामगिरी
अॅपलचे सीईओ टिम कुक म्हणाले की, स्मार्टफोन मार्केटमध्ये कंपनीच्या कामगिरीमुळे ते खूप खूश आहेत. कंपनीच्या उच्च अधिकार्‍यांनी सांगितले की, भारतीय बाजारपेठेत अॅपला वाटा कमी आहे, पण कंपनीच्या ताज्या कमाईतील भारताची कामगिरी ठळकपणे दिसून आली आहे. भारतात सुरू झालेल्या स्टोअरची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली झाली आहे. 

अॅपलच्या तिसऱ्या तिमाहीतील कमाईचे आकडे
कंपनीने तिसर्‍या तिमाहीत $81.8 अब्जचा महसूल मिळवला, जो मागील वर्षीच्या कालावधीत $82.9 अब्ज पेक्षा 1 टक्क्यांनी कमी आहे. कंपनीचे ऑपरेटिंग उत्पन्न देखील किरकोळ घसरून $22.99 अब्ज झाले आहे, जे मागील वर्षीच्या कालावधीत $23.07 अब्ज होते. आयफोनचा महसूल 2 टक्क्यांनी घसरून 39.7 अब्ज डॉलरवर आला आहे, जो एका वर्षापूर्वीच्या 40.7 अब्ज डॉलरवर आला होता.

मॅकचा महसूल एका वर्षापूर्वी 7 टक्क्यांवरून $ 6.8 अब्जपर्यंत घसरला. महसुलात सर्वात मोठी घट आयपॅडमधून दिसून आली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 टक्क्यांनी कमी $5.8 अब्ज झाली. विअरेबल्स वस्तूंबद्दल बोलायचे झाल्यास, मागील वर्षाच्या तुलनेत त्यात 2 टक्क्यांनी वाढ होऊन $8.3 अब्ज झाले आहे.

Web Title: More than 410 billionaires in the world, Apple earns Rs 16,45,42,68,46,000 in three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.