नवी दिल्ली : देशात सध्या दाेन प्रकारच्या कररचना आहेत. नवी कररचना सरकारने दाेन वर्षांपूर्वी सादर केली हाेती. ही रचना सध्याच्या घडीला सर्वाधिक लाेकांना पसंत पडली आहे. देशातील ७२ टक्क्यांपेक्षा जास्त करदात्यांनी नवी रचना निवडून आयकर विवरण दाखल केले आहेत. ही रचना सर्वात साेपी आणि फायदेशीर असल्याचे या करदात्यांचे म्हणणे आहे.
७.२८ काेटी विवरण दाखल- ७.२८ काेटी विवरण २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ३१ जुलैपर्यंत दाखल झाले हाेते.- ४ काेटी विवरणांवर १५ दिवसांमध्येच प्रक्रिया करण्यात आली आहे.- ५८.५७ लाख लाेकांनी प्रथमच विवरण दाखल केले.