Lokmat Money > बिझनेस न्यूज > २०२२ पर्यंत कोरोना पूर्वस्थितीत येणार जागतिक अर्थव्यवस्था, Moody’s म्हणते, कोरोनासोबतच जगावं लागणार

२०२२ पर्यंत कोरोना पूर्वस्थितीत येणार जागतिक अर्थव्यवस्था, Moody’s म्हणते, कोरोनासोबतच जगावं लागणार

Moody’s Investors Service : कोरोना विषाणू आपले म्युटेशन बदलत असल्यानं त्यांना कोरोनासोबत जगावं लागणार असल्याचं मुडीजचं म्हणणं. लसीकरणाचा वेग वाढल्यास महासाथ कमी होण्यास मदत होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 09:26 PM2021-03-11T21:26:41+5:302021-03-11T21:28:22+5:30

Moody’s Investors Service : कोरोना विषाणू आपले म्युटेशन बदलत असल्यानं त्यांना कोरोनासोबत जगावं लागणार असल्याचं मुडीजचं म्हणणं. लसीकरणाचा वेग वाढल्यास महासाथ कमी होण्यास मदत होईल.

Most economies not to return to pre pandemic activity levels until 2022 Moodys | २०२२ पर्यंत कोरोना पूर्वस्थितीत येणार जागतिक अर्थव्यवस्था, Moody’s म्हणते, कोरोनासोबतच जगावं लागणार

२०२२ पर्यंत कोरोना पूर्वस्थितीत येणार जागतिक अर्थव्यवस्था, Moody’s म्हणते, कोरोनासोबतच जगावं लागणार

Highlightsलसीकरणाचा वेग वाढल्यास महासाथ कमी होण्यास मदत होईल.कोरोनासोबत जगावं लागणार असल्याचं मुडीजचं म्हणणं.

जागतिक रेटिंग एजन्सी Moody’s Investors Service च्या म्हणण्यानुसार कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर क्रेडिटमध्ये जी घसरण झाली आहे ती फार कमी कालावधीसाठी आहे. परंतु जगभरातील बहुतांश अर्थव्यवस्थांना कोरोना महासाथी पूर्वस्थितीत येण्यासाठी २०२२ पर्यंतची वाट पाहावी लागणार असल्याचं अनुमानही त्यांनी व्यक्त केलं आहे. गेल्या वर्षी २०२० मध्ये ११ मार्च रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाला महासाथ म्हणून घोषित केलं होतं. त्यानंतर जगभरातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून आला होता. या महासाथीमुळे जगभराच्या अर्थव्यवस्थांना मोठ्या प्रमाणात फटका बसला होता आणि क्रेडिटमध्येही घसरण झाली होती. 

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जगभरात क्रेडिटशी निगडीत अनेक मोठी आव्हानं आली. परंतु याणध्ये घसरण अजून काही काळासाठी राहणार असल्याचं मुडीजनं आपल्या अहवालात नमूद केलं आहे. मुडीजच्या अनुमानानुसार जागतिक रिकव्हरीचा वेग हा कमी असेल आणि मायक्रोइकॉनॉमिक आऊटलूकबद्दल अनिश्चितता सामान्य पेक्षा अधिक असेल. तसंच म्युटेशन्समुळे कोरोना विषाणूच्या सोबत राहण्याची सवय आपल्याला करावी लागणार असल्याचंही मुडीजनं म्हटलं आहे.

लसीकरणावर कोरोनाचा वेग ठरेल

मुडीजनुसार महासाथीचा वेग कमी झाल्यानंतर पॉलिसी अॅक्शन्स इकॉनॉमिक अॅक्टिव्हिटी फायनॅन्शिअल मार्केटला अधिक आधार देतील. तसंच पॉलिसी मेकर्स मोठ्या कालावधीसाठी इकॉनॉमिक अॅक्टिव्हिटीला सपोर्ट करत राहतील आणि काही प्रकरणांमध्ये पुढील वर्षांपर्यंतही मदत करतील. लसीकरणाच्या कार्यक्रमाचा वेग वाढल्यानंतर २०२१ मध्ये महासाथ हळूहळू कमी होत जाते. यामुळे सरकारांना लॉकडाऊनच्या नियमांमध्ये सूट देण्यास मदत मिळेल. परंतु ज्या ठिकाणी लसीकरणाचा वेग कमी असेल त्या ठिकाणी संक्रमणाची चिंता कायम राहणार असल्याचंही मुडीजनं म्हटलं आहे.

कोरोनासोबत जगावं लागेल

कोरोना विषाणूचे नवे म्युटेशन्स अधिक संसर्गजन्य असल्यामुळे परिस्थिती सामान्य होण्याबाबत आताही भीती कायम आहे. अशातच मुडीजच्या म्हणण्यानुसार आता सर्वांना कोरोना सोबतच जगावं लागणार आहे. तसंच संसर्ग करण्यासाठी प्रयत्नही करावे लागणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे.

Web Title: Most economies not to return to pre pandemic activity levels until 2022 Moodys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.