Lokmat Money > बिझनेस न्यूज > Most Expensive Stock : 'हा' आहे जगातील सर्वात महागडा स्टॅाक, एका शेअरची किंमत 3,82,65,000 रुपये

Most Expensive Stock : 'हा' आहे जगातील सर्वात महागडा स्टॅाक, एका शेअरची किंमत 3,82,65,000 रुपये

अनेक शेअर्सच्या किंमतीत घसरण होत असताना मात्र या शेअरची किंमत मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 11:41 AM2022-03-17T11:41:01+5:302022-03-17T11:41:39+5:30

अनेक शेअर्सच्या किंमतीत घसरण होत असताना मात्र या शेअरची किंमत मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

Most Expensive Stock warren buffett berkshire hathaway world most expensive stock share price rs 38265000 know more | Most Expensive Stock : 'हा' आहे जगातील सर्वात महागडा स्टॅाक, एका शेअरची किंमत 3,82,65,000 रुपये

Most Expensive Stock : 'हा' आहे जगातील सर्वात महागडा स्टॅाक, एका शेअरची किंमत 3,82,65,000 रुपये

सध्या युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाचा परिणाम अनेक देशांच्या शेअर बाजारावर झाला आहे. परंतु अशा परिस्थितीतही काही कंपन्यांचे शेअर जबरदस्त कामगिरी करत आहेत. जगातील दिग्गज गुंतवणूकदार आणि जगातील पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती वॉरेन बफे (Warren Buffett) यांची कंपनी बर्कशायर हॅथवेच्या (Berkshire Hathaway) शेअरनं विक्रमी उच्चांक गाठला आहे. बर्कशायर हॅथवेच्या एका शेअरची किंमत 3,82,65,000 रुपये म्हणजेच जवळपास 5 लाख डॉलर्स इतकी झाली आहे. कंपनीचं मार्केट कॅप आता 731 अब्ज डॉलर्स इतकं झालंय. अमेरिकेतील ही सहावी सर्वात मोठी कंपनी आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार बर्कशायर क्लास ए शेअरच्या किंमतीत यावर्षी १० टक्क्यांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे या दरम्यान अमेरिकन शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक  Standard & Poor’s 500 Index (S&P) मध्ये १२ टक्क्यांची घसरण झाली आहे. या कंपनीचं मुख्यालय नेब्रास्काच्या ओमाहामध्ये आहे.

बर्कशायर हॅथवेमध्ये बफे यांची 16.2 टक्के भागीदारी
फोर्ब्सनुसार बफे यांच्याकडे बर्कशायर हॅथवेमध्ये 16.2 टक्के हिस्सा आहे. कंपनीच्या स्टॉकमध्ये आलेल्या तेजीमुळे 119.2 अब्ज डॉलर्स एवढ्या संपत्तीसह बफे हे जगातील पाचव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

3.8 कोटी रुपयांचा एक शेअर
सोमवारच्या ट्रेडिंगमध्ये बर्कशायर हॅथवेचा शेअरच्या किंमतीत वाढ झाली आणि त्यानं 5,00,022.84 डॉलर्सचा सर्वकालीन उच्चांक गाठला. 2019 आणि 2020 मध्ये मोठी घसरण झाल्यानंतर बर्कशायरच्या शेअर्सनं 2021 मध्ये S&P 500 थोडी चांगली कामगिरी केली आहे. सोमवारी, कंपनीचा शेअर 0.8 टक्क्यांनी वाढून 493,785 डॉलर्स वर बंद झाला.

या कंपनीचा बहुतांश व्यवसाय हा अमेरिकेत आहे. तसंच कंपनीच्या 3 लाख 72 हजार कर्मचाऱ्यांपैकी 77 टक्के कर्मचारी अमेरिकेत आहेत. अमेरिकेच्या बाहेर कंपनी चीनमध्ये विस्ताराची योजना आखत आहे. डेअरी क्वीन 2030 पर्यंत चीनमध्ये 600 स्टोअर्स सुरू करण्याची योजना आकत आहे. अमेरिकेच्या बाहेर ही त्यांची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. बफे यांनी 1965 मध्ये जेव्हा या टेक्सटाईल कंपनीची सूत्रं हाती घेतली होती, तेव्हा या शेअरची किंमत 20 डॉलर्स पेक्षा कमी होती. 2021 मध्ये या कंपनीकडे 146.7 अब्ज डॉलर्स इतकी कॅश होती. त्यानंतर कंपनीनं Occidental Petroleum Corp मध्ये 5 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक रक्कम गुंतवणूक केली होती.

Web Title: Most Expensive Stock warren buffett berkshire hathaway world most expensive stock share price rs 38265000 know more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.