गुंतवणूकदारांमध्ये स्मॉल कॅप फंडांची (Small Cap Funds) प्रचंड क्रेझ आहे. गेल्या तीन महिन्यांत या कॅटेगरीत सुमारे 11,000 कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक झाली आहे. या फंडात मिळणाऱ्या मोठ्या परताव्यामुळे यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढली आहे. स्मॉल कॅप फंडांच्या रेग्युलर स्कीम्सनं 3 वर्षांच्या कालावधीत सरासरी 52 टक्के आणि पाच वर्षांच्या कालावधीत 27 टक्के परतावा दिला आहे. हा परतावा एकरकमी गुंतवणूकदारांसाठी आहे. एसआयपी केलेल्या गुंतवणूकदारांना मिळालेला परतावा आणखी जास्त आहे. गेल्या 3 महिन्यांमध्ये स्मॉल कॅप फंड्स कॅटेगरीच्या कोणत्या स्कीम्सवर गुंतवणूकदारांनी सर्वाधिक भरवसा दाखवला आहे आणि कोणाची कामगिरी चांगली आहे हे पाहू.
यात सर्वाधिक गुंतवणूकव्हॅल्यू रिसर्चच्या अहवालानुसार निप्पॉन इंडिया, क्वांट स्मॉलकॅप, एचडीएफसी स्मॉलकॅप आणि टाटा स्मॉलकॅप फंडांमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक झाली. गेल्या तीन महिन्यांतील या कॅटेगरीतील निम्मी गुंतवणूक या फंडांमध्येच झाली आहे.
Nippon India Small Cap Fund--2400crQuant Small Cap Fund--1360crHDFC Small Cap Fund--1300crTata Small Cap Fund--1100cr
निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड - या फंडाचा एनएव्ही 114.46 रुपये आहे. तर फंड साईज 31945 कोटी रुपये आहे. या फंडाचा एक्सपेन्स रेश्यो 1.58 टक्के आहे. लमसम गुंतवणूकदारांना तीन वर्षांत सरासरी 46.85 टक्के आणि पाच वर्षांत 22.23 टक्के परतावा मिळालाय. तर एसआयपीनं गुंतवणूकदारांना तीन वर्षांत 35.22 टक्के वार्षिक परतावा दिला आहे आणि पाच वर्षांत 32.56 टक्के परतावा दिलाय. जर एखाद्या गुंतवणूकदाराने पाच वर्षांपूर्वी 10,000 रुपयांची एसआयपी सुरू केली असती, तर आज त्याचा फंड 13.31 लाख रुपये झाला असता. तर त्यानं आजपर्यंत ६ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती.
क्वांट स्मॉल कॅप फंड - क्वांट स्मॉलकॅप फंडाचा एनएव्ही 182.48 रुपये आहे. या फंडाची साईज 5565 कोटी रुपये आहे. तर एक्सपेन्स रेश्यो 0.62 टक्के आहे. एकरकमी गुंतवणूकदारांसाठी, या फंडानं तीन वर्षांत सरासरी 55.66 टक्के आणि पाच वर्षांत 28.48 टक्के परतावा दिला आहे. एसआयपी गुंतवणूकदारांना तीन वर्षांत सरासरी 38 टक्के आणि पाच वर्षांत 40 टक्के परतावा मिळालाय. पाच वर्षांपूर्वी जर 10,000 रुपयांची एसआयपी सुरू केली असती, तर आज हा निधी 16 लाख रुपयांचा झाला असता. एकूण गुंतवणुकीची रक्कम 6 लाख रुपये झाली असती.
एचडीएफसी स्मॉल कॅप फंड - या फंडाचा एनएव्ही 99.35 रुपये आहे. तर फंडाची साईज 18999 कोटी रुपये आहे. या फंडानं पाच वर्षांत एकरकमी गुंतवणूकदारांना सरासरी 17.29 टक्के आणि SIP गुंतवणूकदारांना 28.17 टक्के परतावा दिलाय. जर एखाद्या गुंतवणूकदारानं पाच वर्षांपूर्वी 10,000 रुपयांची एसआयपी सुरू केली असती तर त्याचं मूल्य आज 12 लाख रुपये झालं असतं.
टाटा स्मॉल कॅप फंड - या फंडाचा एनएव्ही 28 रुपये आहे. तर फंडाची साईज 5233 कोटी रुपये आहे. हा फंड नोव्हेंबर 2018 मध्ये सुरू करण्यात आला होता. तेव्हापासून, त्याने एकरकमी गुंतवणूकदारांना 24.39 टक्के परतावा दिला आहे. एसआयपीच्या गुंतवणूकदारांनी एका वर्षात सरासरी 38.15 टक्के, 2 वर्षात 25.43 टक्के आणि तीन वर्षात 31.26 टक्के परतावा दिलाय.
(टीप- निधीची कामगिरी 27 जुलै रोजीच्या कामगिरीवर आधारित आहे. स्रोत- AMFI. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा जाणकारांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)