Join us

२०३२ पर्यंत मुंबई सर्वाधिक लोकप्रिय शहर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 4:51 AM

देशाची आर्थिक राजधानी २०३२ पर्यंत जगातील सर्वाधिक लोकप्रिय शहर होईल, असा विश्वास जपानचे कॉन्सल जनरल रिओजी नोडा यांनी व्यक्त केले.

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी २०३२ पर्यंत जगातील सर्वाधिक लोकप्रिय शहर होईल, असा विश्वास जपानचे कॉन्सल जनरल रिओजी नोडा यांनी व्यक्त केले. जपानने ‘परदेश विकास सहकार्य’ कार्यक्रमांतर्गत भारताला २२० अब्ज रुपयांचे साहाय्य देऊ केले आहे. त्यापैकी ५० टक्के मदत मुंबईतील विकासकामांसाठी करण्यात येत आहे.भारतीय उद्योग महासंघातर्फे (सीआयआय) बुधवारी उत्पादन व विकासकामांबाबत परिसंवाद झाला. त्यामध्ये नोडा प्रमुख अतिथी होते. ते म्हणाले, मुंबईचे आंतरराष्टÑीय स्तरावरील स्थान दिवसेंदिवस बळकट होत आहे. यासाठीच जपानने मुंबई मेट्रो ३ला ४५ अब्ज रुपयांचे सहकार्य देऊ केले आहे. मुंबई-नवी मुंबई यांना जोडणाऱ्या ट्रान्स हार्बर लिंकसाठीही ९० अब्जांचे सहकार्य दिले आहे. यापैकी ट्रान्स हार्बर लिंक २०२२ पर्यंत पूर्ण होईल.जपानमध्ये ८५ टक्के प्लॅस्टिक बाटल्यांची पुनर्प्रक्रिया होते. मुंबईत दररोज ७ हजार व महिन्याला २.१० लाख टन कचरा तयार होतो. यामुळे कचरा पुनर्प्रक्रिया क्षेत्रात जपान भारताला सहकार्य करण्यास इच्छुक आहे, असेही नोडा म्हणाले.२०३२ चे आॅलिम्पिक भारतात !भारतीय लोकसंख्या दरवर्षी सात टक्क्यांनी वाढत आहे. यामुळे २०३० पर्यंत देशातील अर्धी लोकसंख्या ही मध्यम मिळकत गटातील असेल. यामुळेच भारत ही जगातील सर्वांत मोठी ग्राहकपेठ असेल. इतक्या मोठ्या संख्येने उपलब्ध असलेल्या ग्राहकांमुळेच २०३२च्या आॅलिम्पिक स्पर्धा भारतात खेळवल्या जाऊ शकतात, असा विश्वास रिओजी नोडा यांनी व्यक्त केला.

टॅग्स :मुंबईबातम्या