Join us  

Mother Dairy Price Hike : अमूलनंतर आता मदर डेअरीचेही दूध महागले! जाणून घ्या नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2022 4:50 PM

Mother Dairy Price Hike : शेतकऱ्यांचा खर्च, तेलाची किंमत आणि पॅकेजिंग मटेरिअलची किंमत यामुळे दुधाच्या दरात वाढ करण्यात आल्याचे मदर डेअरीच्या वतीने सांगण्यात आले.

नवी दिल्ली : आता सर्वसामान्यांना दुधासाठीही जास्त खर्च करावा लागणार आहे. अमूलने दुधाच्या दरात वाढ केल्यानंतर आता मदर डेअरीचे दूधही महागले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली-एनसीआरमध्ये दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले. उद्या म्हणजेच रविवारी रात्रीपासून वाढलेले दर लागू होणार आहेत. 

शेतकऱ्यांचा खर्च, तेलाची किंमत आणि पॅकेजिंग मटेरिअलची किंमत यामुळे दुधाच्या दरात वाढ करण्यात आल्याचे मदर डेअरीच्या वतीने सांगण्यात आले. 6 मार्चपासून नवीन दर लागू होतील. प्रत्येक प्रकारच्या दुधावर नवीन दर लागू होणार आहेत.

यापूर्वी अमूल आणि पराग डेअरीने प्रतिलिटर 2 रुपयांनी दरवाढ जाहीर केली होती. उत्पादन खर्च वाढल्यानंतर दुधाच्या दरात वाढ करण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले होते.

दिल्ली-एनसीआरमध्ये वाढ झाल्यानंतर मदर डेअरीचे नवीन दर...टोकन दूध -                 46 रुपये प्रति लिटरअल्ट्रा प्रीमियम दूध-      32 रुपये  (500ml)फुल क्रीम दूध  -           59 रुपये (1000 ml), 30 रुपये (500 ml)टोन्ड मिल्क -               49 रुपये (1000 ml), 25 रुपये (500 ml)दुहेरी टोन्ड दूध -          43 रुपये (1000 ml), 22 रुपये (500 ml)गाईचे दूध -                 51 रुपये (1000 ml), 26 रुपये (500 ml)सुपर टी मिल्क -          27 रुपये (500 ml). अमूल दूधही महागले!दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी अमूलने देशभरातील बाजारपेठेत दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ सोना, ताजा, शक्ती, टी-स्पेशल, तसेच गाय आणि म्हशीच्या दुधासह अमूल दुधाच्या सर्व ब्रँडवर लागू केली. तब्बल 7 महिने 27 दिवसांच्या कालावधीनंतर अमूलने दरात वाढ करण्यात येत आहे. उत्पादन खर्चात झालेली वाढ हे किमती वाढण्याचे कारण असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनच्या म्हणण्यानुसार, अमूलने गेल्या 2 वर्षांत आपल्या ताज्या दुधाच्या श्रेणीतील दरात केवळ 4 टक्के वाढ केली आहे. पॅकेजिंग, लॉजिस्टिक, पशुखाद्याचा खर्च वाढल्यामुळे ही किंमत वाढली आहे, त्यामुळे दूध संचालन आणि उत्पादनाचा एकूण खर्च वाढला आहे.

टॅग्स :दूध पुरवठादूध