Join us

दहेजमध्ये आंदोलन; यूपीएलचा खुलासा   

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2020 5:28 AM

दहेज हा गुजरातमधील सर्वात मोठा औद्योगिक परिसर आहे. या परिसरात यूपीएल कंपनीचा रासायनिक कारखाना आहे. या कारखान्याविरोधात आंदोलन करण्यात आल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते.

मुंबई : दहेज येथील जीआयडीसीत आपल्या कारखान्याजवळ झालेल्या आंदोलनाचा कंपनीच्या कामकाजाशी संबंध नसल्याचा खुलासा यूपीएल कंपनीतर्फे करण्यात आला आहे. दहेज हा गुजरातमधील सर्वात मोठा औद्योगिक परिसर आहे. या परिसरात यूपीएल कंपनीचा रासायनिक कारखाना आहे. या कारखान्याविरोधात आंदोलन करण्यात आल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. मात्र, कारखाना परिसरात जीआयडीसीतर्फे पुरविल्या जाणाऱ्या जलवाहिन्यांमधून अवैध पाणीपुरवठा जोडण्या स्थानिकांकडून घेण्यात आल्या होत्या. या अवैध जोडण्यांवर जीआयडीसी आणि स्थानिक प्रशासनाने पोलिसांच्या साह्याने कारवाई केली. या कारवाईला विरोध म्हणून स्थानिकांनी आंदोलन केले असून कंपनीच्या रासायनिक कारखान्यातील कामकाज सुरळीत सुरू असल्याचे यूपीएलतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. यूपीएल ही एक जबाबदार कंपनी असून गुजरातमध्ये कंपनीचे दहेजसह वापी, अंकलेश्वर, झागडिया आणि हलोल या ठिकाणी कारखाने असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.

टॅग्स :व्यवसायगुजरात