नागपूर : एमएसएमई ही केंद्र शासकीय संस्था स्टॉक एक्स्चेंज सुरू करणार असून, देशातील आणि परदेशातील लोकांना गुंतवणूक करता येईल. सर्वसामान्यही ‘एमएसएमई’चे शेअर खरेदी करून गुंतवणूक करू शकतील, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
‘महाबीझ’ पदाधिकाऱ्यांशी ते व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांनी शुक्रवारी संवाद साधला. विमा आणि शेअर्समध्ये गुंतवणुकीची संधी सध्या असल्याचे सांगताना गडकरी म्हणाले, प्रगती करणाºया एमएसएमई उद्योगांना रेटिंग मिळेल आणि शासनही १५ टक्के भागभांडवल उपलब्ध करेन.
४५ लाख एमएसएमई उद्योगांना फायदा
आत्मनिर्भर पॅकेजमध्ये ३ लाख कोटी बजेट एमएसएमईला मिळाले. याचा फायदा ४५ लाख एमएसएमई उद्योगांना होणार आहे. ‘फंड आॅफ फंड’च्या माध्यमातून ५० हजार कोटींचे ‘इक्विटी इनफ्यूजन’ जे एमएसएमई उद्योग जलदगतीने प्रगती करीत आहेत, त्यांना याचा फायदा होणार आहे. गडकरी यांनी अॅग्रो एमएसएमईच्या संकल्पनेतून ग्रामीण भागात, जंगल क्षेत्रात आणि आदिवासी भागात उद्योग नेऊन या भागाचा विकास करण्याची संकल्पना मांडली. यामुळे तरुणांना रोजगार आणि उद्योगांना जागा व कच्चा माल उपलब्ध होईल. गावखेड्याची अर्थव्यवस्थाही यामुळे मजबूत होणार आहे, असेही गडकरी म्हणाले.
च्अमॅझॉनसारखे ई मार्केट प्लेसही एमएसएमई तयार करीत आहे. कोरोनामुळे त्याला वेळ लागणार आहे. पण हे संकेतस्थळ सुरू झाल्यानंतर आॅनलाइन व्यवहार लोकांना करता येतील, असेही गडकरी म्हणाले.
च्उच्च तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची उत्पादन निर्मिती यामुळे देशातील उद्योगांना वस्तू निर्यातीची संधी मिळेल. परिणामी अर्थव्यवस्था मजबूत होईल. परकीय गुंतवणूक व उच्च तंत्रज्ञान या दोन्हीची आज आपल्या देशातील उद्योगांना आवश्यकता असल्याचेही नितीन गडकरी म्हणाले.