Lokmat Money > बिझनेस न्यूज > JIOला टक्कर देण्यासाठी एमटीएनएलची धमाकेदार ऑफर

JIOला टक्कर देण्यासाठी एमटीएनएलची धमाकेदार ऑफर

एमटीएनएलनं 319 रुपयांचा जबरदस्त प्लॅन ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2017 10:03 PM2017-03-31T22:03:41+5:302017-03-31T22:03:41+5:30

एमटीएनएलनं 319 रुपयांचा जबरदस्त प्लॅन ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला

MTNL offers a bang for a collision with JIO | JIOला टक्कर देण्यासाठी एमटीएनएलची धमाकेदार ऑफर

JIOला टक्कर देण्यासाठी एमटीएनएलची धमाकेदार ऑफर

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31 - रिलायन्स जिओनं दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवल्यानंतर आता सर्वच कंपन्यांनी ग्राहकांसाठी नवनव्या ऑफर आणल्या आहेत. विशेष म्हणजे सरकारी कंपनी असलेली एमटीएनएल या स्पर्धेत उतरली आहे. एमटीएनएलनं 319 रुपयांचा जबरदस्त प्लॅन ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला असून, या प्लॅनअंतर्गत ग्राहकाला दररोज 3जी स्पीडने 2 जीबी डेटा वापरता येणार आहे. या ऑफरअंतर्गत एमटीएनएल टू एमटीएनएल ग्राहकांना मोफत कॉलिंगचा आनंदही लुटता येणार आहे.

रिलायन्स जिओचा धसका घेत आता एमटीएनएलही बाजारात उतरल्यानं दूरसंचार क्षेत्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रिलायन्स जिओची प्राइम मेंबरशिप न घेणा-या ग्राहकांना स्वतःकडे ओढण्यासाठीच एमटीएनएलनं ही ऑफर ग्राहकांना उपलब्ध करून दिल्याची दूरसंचार क्षेत्रात चर्चा आहे. रिलायन्स जिओची फ्री ऑफरची मुदत संपत असतानाच एमटीएनएलचा हा डेटा प्लॅन 1 एप्रिल म्हणजेच उद्यापासून ग्राहकांच्या सेवेत उतरणार आहे. एमटीएनएलचा हा 319 रुपयांचा डेटा प्लॅन फक्त 28 दिवसांसाठी मर्यादित असणार आहे.

या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2 जीबीपर्यंत डेटा वापरता येणार आहे. तसेच एमटीएनएल टू एमटीएनएल कॉलिंग पूर्णतः मोफत असणार आहे. त्याप्रमाणेच इतर नेटवर्कवर बोलण्यासाठी 25 मिनिटे मोफत मिळणार आहेत. मात्र 25 मिनिटांनंतर प्रत्येक ग्राहकाला 25 पैसे प्रतिमिनिट या दराने पैसे द्यावे लागणार आहेत. खराब नेटवर्क आणि जास्त दर आकारणीमुळे आधीच एमटीएनएलकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे एमटीएनएलच्या या नव्या ऑफरला ग्राहक कसा प्रतिसाद देतात, हे येत्या काळातच समजणार आहे.

Web Title: MTNL offers a bang for a collision with JIO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.