Join us

'या' कंपनीनं आणले जबरदस्त प्लॅन्स; महिन्यात १२५ रूपयांत अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएस आणि रोज २जीबी डेटा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 4:51 PM

ग्राहकांसाठी कंपनीनं आणले जबरदस्त प्लॅन्स, महिन्याला येणार १२५ रूपयांचा खर्च

ठळक मुद्देग्राहकांसाठी कंपनीनं आणले जबरदस्त प्लॅन्समहिन्याला येणार १२५ रूपयांचा खर्च

सध्या सर्वच दूरसंचार कंपन्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी काही ना काही नवे आकर्षक प्लॅन्स ग्राहकांसाठी घेऊन येत आहेत. सरकारची दूरसंचार कंपनी BSNL आणि MTNL मध्ये समोरील आव्हान आणि एमटीएनएलचा अधिक खर्च पाहून महत्त्वाचा निर्णय झाला होता. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी या दोन्ही कंपन्या एकत्र केल्या जाणार असल्याचं म्हटलं होतं. आता MTNL नं आपल्या प्रमोशनल प्लॅन्सचा विस्तार केला आहे. MTNL चा १९६ रूपयांचा प्लॅन ९० दिवसांकरिता चालणार असून ऑगस्ट महिन्यापर्यंत याचा लाभ घेता येणार आहे. तर स्पेशल टॅरिफ म्हणून कंपनीनं १९६, ३२९, ३९९, १२९८ आणि १४९९ रूपयांचे प्लॅन आणले आहेत. 

MTNL च्या १९६ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १.५ जीबी हायस्पीड डेटा देण्यात येतो. तसंच याची वैधता २८ दिवसांची आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएसचाही लाभ देण्यात येतो. 

३२९ रूपयांचा प्लॅनMTNL च्या ३२९ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज २ जीबी हायस्पीड डेटा देण्यात येतो. तसंच याची वैधता ४५ दिवसांची आहे. अन्य फायद्यांमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएसचा लाभ ग्राहकांना देण्यात येतो. 

३९९ रूपयांचा प्लॅनया प्लॅनसोबत ग्राहकांना दररोज ५०० एमबी डेटा देण्यात येतो. तसंच या प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. अन्य फायद्यांमध्ये कंपनीनं अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस देते. 

१२९८ रूपयांचा प्लॅनMTNL च्या १२९८ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज २ जीबी हायस्पीड डेटा देण्यात येतो. याची वैधता २७० दिवसांची आहे. अन्य फायद्यांमध्ये ग्राहकांना डेटाशिवाय कोणतेही बेनिफिट्स देण्यात येत नाहीत. 

१४९९ रूपयांचा प्लॅन  कंपनी ग्राहकांना १४९९ रूपयांचा प्लॅनदेखील ऑफर करते. यामध्ये ग्राकांना ३६५ दिवसांची वैधता आणि दररोज २ जीबी हायस्पीड डेटा देण्यात येतो. या प्लॅनसोबत ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस देण्यात येतात. या प्लॅनचा दर महिन्याचा खर्च पाहिला तर तो १२५ रूपये इतका येतो. 

टॅग्स :एमटीएनएलबीएसएनएलस्मार्टफोनइंटरनेट