Join us

MTNL Share Price Today : १५ दिवसांत ₹४० वरुन ₹९७ पार गेला एमटीएनएलचा शेअर; १४०% ची तुफान तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 12:31 PM

MTNL Share Price Today : महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या (एमटीएनएल) शेअर्समध्ये सातत्यानं तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी एमटीएनएलचा शेअर ५ टक्क्यांनी वधारून ९७.०८ रुपयांवर पोहोचला.

MTNL Share Price : महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या (एमटीएनएल) शेअर्समध्ये सातत्यानं तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी एमटीएनएलचा शेअर ५ टक्क्यांनी वधारून ९७.०८ रुपयांवर पोहोचला. टेलिकॉम कंपनीच्या शेअर्सनं ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला आहे. गेल्या १५ दिवसांत एमटीएनएलचे शेअर्स १४० टक्क्यांनी वधारले आहेत. गुरुवारी एमटीएनएलचा शेअर ९२.४६ रुपयांवर बंद झाला. कंपनीच्या शेअरची ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळी १९.३७ रुपये आहे.

१५ दिवसांत ४० वरुन ९७ वर

महानगर टेलिफोन निगम लिमिटेडचा (एमटीएनएल) शेअर १५ दिवसांत ४० रुपयांवरून ९७ रुपयांवर पोहोचला आहे. महानगर टेलिफोन निगम लिमिटेडचा (एमटीएनएल) शेअर ५ जुलै २०२४ रोजी ४०.५५ रुपयांवर होता. टेलिकॉम कंपनीचा शेअर २६ जुलै २०२४ रोजी ९७.०८ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या १५ दिवसांत कंपनीच्या शेअरमध्ये १४० टक्के वाढ झाली. कंपनीच्या शेअरनं १५ दिवसांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. गेल्या पाच दिवसांत एमटीएनएलचे शेअर्स जवळपास ३१ टक्क्यांनी वधारलेत. या कालावधीत कंपनीचे शेअर्स ७४ रुपयांवरून ९७ रुपयांवर गेले आहेत.

वर्षभरात ३९७ टक्क्यांची वाढ

गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये ३९७ टक्के वाढ झाली आहे. २६ जुलै २०२३ रोजी एमटीएनएलचा शेअर १९.५४ रुपयांवर होता. टेलिकॉम कंपनीचा शेअर आज ९७.०८ रुपयांवर पोहोचला आहे. एमटीएनएलच्या शेअरमध्ये यंदा आतापर्यंत १९३ टक्के वाढ झाली आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर्स ३३ रुपयांवरून ९७ रुपयांवर गेले आहेत. गेल्या दोन वर्षांत एमटीएनएलच्या शेअरमध्ये ३०९ टक्के वाढ झालीये. एमटीएनएलचे मार्केट कॅप ६११६ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. कंपनीत पब्लिक शेअरहोल्डिंग ४३.७५ टक्के आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :एमटीएनएलशेअर बाजार