- सोपान पांढरीपांडेनागपूर : अमेरिकेतील बलाढ्य सुपरमार्केट शृंखला वॉलमार्टने भारतीय इंटरनेट व्यापार कंपनी फ्लिपकार्टचे ७७ टक्के शेअर्स १६ बिलियन डॉलरमध्ये विकत घेण्याचा सौदा केला आहे. पुढील वर्षी जूनपर्यंत हा व्यवहार पूर्ण करण्याचे दोन्ही कंपन्यांनी मान्य केले आहे. परंतु या कराराला भारतातील किरकोळ व ठोक व्यापाºयांचा विरोध आहे. त्यासाठी सोमवारी व्यापाºयांनी देशभर १००० शहरांत धरणे आंदोलन करून शासकीय अधिका-यांना हा सौदा रद्द करण्याची मागणी करणारी निवेदने दिली आहेत. हा व्यवहार पूर्ण झाला तर देशातील १० लाख किरकोळ व्यापारी संपतील, अशी भीती व्यापा-यांनी व्यक्त केली आहे.करार काय आहे?फ्लिपकार्ट सिंगापूर ही इंटरनेट व्यापार कंपनी दिल्लीच्या सचिन आणि बिन्नी बन्सल यांनी सुरू केली. सध्या त्यांचे ११ टक्के भागभांडवल फ्लिपकार्टमध्ये आहे व चीनची गुंतवणूक कंपनी सॉफ्टबँक, अमेरिकन कंपनी टेन्सेंट होल्डिंग्ज, टायगर ग्लोबल मॅनेजमेंट व बिल गेट्सचे मायक्रोसॉफ्टकडे उरलेले ८९ टक्के भांडवल आहे. याशिवाय वॉलमार्ट फ्लिटकार्टमध्ये दोन अब्ज डॉलर्स (१३००० कोटी रुपये) गुंतवणूक करणार आहे. सर्व व्यवहार सिंगापूरमध्ये पूर्ण होणार आहे. कारण तिथे कॅपिटल गेब्स टॅक्स द्यावा लागत नाही. सचिन बन्सल कंपनीतून बाहेर पडतील तर बिन्नी बन्सल नव्या कंपनीचे सीईओ होणार आहेत.व्यापा-यांचा विरोध का?सरकारने सुरुवातीला ठोक व्यापारात १०० टक्के विदेशी गुंतवणूक मंजूर केली, त्यानंतर मल्टी-ब्रँड म्हणजे एकाच दुकानात अनेक कंपन्यांचा माल/ ब्रँड्स मिळणाºया व्यापारात १०० टक्के विदेशी गुंतवणूक मंजूर केली. त्या वेळी सिंगल ब्रँड म्हणजे एकाच कंपनीच्या माल विकणाºया मोठ्या विदेशी कंपन्यांना कधीही १०० टक्के गुंतवणुकीची परवानगी देणार नाही, असे धोरण सरकारने जाहीर केले होते. पण २०१६ साली सरकारने घूमजाव केले व सिंगल ब्रँडलाही १०० टक्के विदेशी गुंतवणूक करण्याची मंजुरी दिली, अशी माहिती कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सचे राष्टÑीय अध्यक्ष बी.सी. भरतिया यांनी दिली.
सिंगल ब्रँडचा नेमका धोका काय?सिंगल ब्रँडच्या या मंजुरीअंतर्गत वॉलमार्ट - फ्लिपकार्ट व्यवहार होतो आहे. यामुळे भविष्यात वॉलमार्ट अन्नधान्य, दुधापासून ते जवळपास प्रत्येक उत्पादन वॉलमार्ट या नावाने/ ब्रँडने बनवून घेईल. ते स्वत:च्या सुपर मार्केटमध्ये विकतीलच पण शिवाय फ्लिपकार्टच्या इंटरनेट व्यापार प्रणालीद्वारेही विकू शकेल.फ्लिपकार्टने देशभर भलीमोठी वेअरहाउसेस बांधून ठेवली असून वाहनांसहित माल वितरण व्यवस्था उभी केली आहे. या सर्व पायाभूत सोयी वॉलमार्टला उपलब्ध होतील व त्यांचा उपयोग वॉलमार्ट व्यवसायासाठी करेल. सध्या किरकोळ व्यापाराला इंटरनेट (आॅनलाइन) व्यापार, डेबिट/ क्रेडिट कार्ड व कुरियर कंपन्यांपासून मोठा धोका निर्माण झाला आहे. यात वॉलमार्टसारखी बलाढ्य कंपनी उतरली तर एकाच ब्रँडची सर्व उत्पादने आॅर्डर दिल्यावर काही तासांतच घरपोच मिळणार आहेत व त्यामुळे किरकोळ व्यापारी संपणार आहेत. डी मार्टसारख्या भरतीय सुपरमार्केट कंपन्यांनीसुद्धा आपली वितरण व्यवस्था उभी केली आहे व फ्लिपकार्टप्रमाणे याही कंपन्या वॉलमार्टच्या घशात जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे किमान १० लाख किरकोळ व्यापारी संपणार आहेत. म्हणून व्यापाºयांनी या सौद्याला विरोध सुरू केला आहे.नवी मुंबईत व्यापा-यांची निदर्शनेनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स, नवी मुंबई मर्चंट चेंबरसह इतर व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी वॉलमार्टसह फ्लिपकार्टच्या विलीनीकरणाविरोधात निदर्शने केली. देशातील रिटेल व्यवसाय व छोटे व्यावसायिकांचे अस्तित्व टिकण्यासाठी केंद्र शासनाने ठोस धोरण तयार करावे. वॉलमार्टसारख्या कंपन्यांना नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी नियम तयार करावे, अशी मागणी या वेळी व्यापाºयांनी केली.बाजार समितीमधील प्रमुख व्यापारी संघटना व माथाडी कामगारांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. याविषयी देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला असून कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सच्या वतीने दिल्ली येथे २३ ते २५ जुलैला अधिवेशनाचे आयोजन केले असल्याची माहिती व्यापारी प्रतिनिधी कीर्ती राणा यांनी दिली. द ठाणे रायगड कन्झ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटर असोसिएशननेही ठाणे जिल्हाधिकाºयांना याविषयी निवेदन दिले आहे. या वेळी असोसिएशनचे सचिव विजय ताम्हाणे, परेश खत्री, सुनील शहा, प्रवीण लाठे, राजेंद्र गुप्ता आदी पदाधिकारी उपस्थित होते.