Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुद्रा बँकेचा अधिक लाभ जुन्याच व्यावसायिकांना!

मुद्रा बँकेचा अधिक लाभ जुन्याच व्यावसायिकांना!

मुद्रा बँक हा पंतप्रधान मोदींचा स्वप्नांकित प्रकल्प. लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिनाच्या भाषणातही पंतप्रधानांनी या बँकेचा गौरवपूर्ण उल्लेख केला

By admin | Published: August 17, 2016 04:33 AM2016-08-17T04:33:44+5:302016-08-17T04:33:44+5:30

मुद्रा बँक हा पंतप्रधान मोदींचा स्वप्नांकित प्रकल्प. लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिनाच्या भाषणातही पंतप्रधानांनी या बँकेचा गौरवपूर्ण उल्लेख केला

Mudra Bank's advantage over old professionals! | मुद्रा बँकेचा अधिक लाभ जुन्याच व्यावसायिकांना!

मुद्रा बँकेचा अधिक लाभ जुन्याच व्यावसायिकांना!

सुरेश भटेवरा , नवी दिल्ली
मुद्रा बँक हा पंतप्रधान मोदींचा स्वप्नांकित प्रकल्प. लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिनाच्या भाषणातही पंतप्रधानांनी या बँकेचा गौरवपूर्ण उल्लेख केला. महिला व्यावसायिकांना या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ झाल्याचेही पंतप्रधान म्हणाले. मोठ्या बँकांकडून नव्या व्यावसायिकांना सहजासहजी कर्ज मिळत नाही, अशांना ही बँक मदत करते. ताज्या आकडेवारीनुसार मुद्रा बँकेच्या पहिल्या वर्षात नव्याऐवजी जुन्याच व्यावसायिकांनी या योजनेचा अधिक लाभ उठवल्याचे चित्र सामोरे आले आहे.
पंतप्रधानांच्या पुढाकाराने एप्रिल २0१५मध्ये मुद्रा बँकेचा वाजत
गाजत प्रारंभ झाला. त्यानंतर, मुद्रा बँकेशी ३.४९ कोटी खाती संलग्न करून जोडण्यात आली. त्यात फक्त १.२५ कोटी नवे व्यावसायिक खातेधारक आहेत.
वर्षभरातील कामगिरी
पहिल्या वर्षाच्या अहवालानुसार खातेधारकांना मार्चअखेर फक्त ५.१७ लाख मुद्रा कार्ड वितरित करण्यात मुद्रा बँक योजना यशस्वी ठरली आहे.
खासगी व बहुराष्ट्रीय बँकांकडून कार्ड वितरणात मिळणारा प्रतिसाद अत्यल्प आहे.
खासगी क्षेत्रातल्या काही बँकांचा अपवाद वगळता बहुतांश कार्डांचे वितरण सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका अथवा प्रादेशिक स्तरावरील ग्रामीण बँकांनीच केले आहे.

छोट्या व नव्या व्यावसायिकांना, त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी स्वस्त दराने कर्ज उपलब्ध करून देण्याच्या हेतूने झाला आहे.
या बँकेतर्फे व्यावसायिकांना शिशु, किशोर व तरुण अशा तीन वर्गात कर्जवाटप केले जाते. शशु प्रवर्गात ५0 हजारांपर्यंत, किशोर प्रवर्गात ५0 हजार ते ५ लाखांपर्यंत, तर तरुण प्रवर्गात ५ ते १0 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळण्याची सुविधा आहे. मुद्रा बँकेने २0१५/१६ या पहिल्या वर्षात १.३२ लाख कोटींचे कर्जवाटप केले. ठरवलेल्या उद्दिष्टापेक्षा ते अधिक म्हणजे १0९ टक्के झाले. मुद्रा बँकेच्या एकूण ३.४९ कोटी खातेधारकांमध्ये २.७६ कोटी खातेधारक महिला आहेत.

महिला खातेधारकांपैकी ८0 टक्के महिलांना एप्रिलपर्यंत ६३ हजार कोटींचा कर्जपुरवठा करण्यात आला. पहिल्या वर्षात या प्रकल्पाचा लाभ
मात्र ६४ टक्के जुन्याच व्यावसायिकांनी उचलला.

यंदा २0१६/१७ या आर्थिक वर्षात १.८0 लाख कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्य मुद्रा बँकेने निर्धारित केले आहे. कर्जवाटपाचा हा इष्टांक मोठा दिसत असला, तरी मुद्रा बँकेपुढे सर्वात मोठे आव्हान मात्र, अधिकाधिक नव्या व्यावसायिकांना कर्जपुरवठा करण्याचे आहे.

Web Title: Mudra Bank's advantage over old professionals!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.