Lokmat Money > बिझनेस न्यूज > Muhurat Trading: दिवाळीत होतं मुहूर्त ट्रेडिंग, शेअर बाजारासाठी खास आहे त्याचा इतिहास; जाणून घ्या

Muhurat Trading: दिवाळीत होतं मुहूर्त ट्रेडिंग, शेअर बाजारासाठी खास आहे त्याचा इतिहास; जाणून घ्या

Muhurat Trading: दरवर्षी दिवाळीच्या संध्याकाळी शेअर बाजारात एक खास ट्रेडिंग सेशन आयोजित केलं जातं, ज्याला मुहूर्त ट्रेडिंग म्हणतात. दिवाळी म्हणजे एका नव्या युगाची सुरुवात. या काळात पूजेच्या वेळी केलेली गुंतवणूक खूप चांगली मानली जाते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 09:30 AM2024-10-31T09:30:16+5:302024-10-31T09:31:17+5:30

Muhurat Trading: दरवर्षी दिवाळीच्या संध्याकाळी शेअर बाजारात एक खास ट्रेडिंग सेशन आयोजित केलं जातं, ज्याला मुहूर्त ट्रेडिंग म्हणतात. दिवाळी म्हणजे एका नव्या युगाची सुरुवात. या काळात पूजेच्या वेळी केलेली गुंतवणूक खूप चांगली मानली जाते.

Muhurat Trading Muhurat trading happens during Diwali its history is special for stock market know details | Muhurat Trading: दिवाळीत होतं मुहूर्त ट्रेडिंग, शेअर बाजारासाठी खास आहे त्याचा इतिहास; जाणून घ्या

Muhurat Trading: दिवाळीत होतं मुहूर्त ट्रेडिंग, शेअर बाजारासाठी खास आहे त्याचा इतिहास; जाणून घ्या

Muhurat Trading: दरवर्षी दिवाळीच्या (Diwali) संध्याकाळी शेअर बाजारात (Share Market) एक खास ट्रेडिंग सेशन आयोजित केलं जातं, ज्याला मुहूर्त ट्रेडिंग (Muhurat Trading) म्हणतात. दिवाळी म्हणजे एका नव्या युगाची सुरुवात. या काळात पूजेच्या वेळी केलेली गुंतवणूक खूप चांगली मानली जाते आणि लोकांच्या या भावना लक्षात घेऊन दिवाळीत शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी एक तासाची विशेष विंडो असते. या काळात गुंतवणूकदार आपल्या डीमॅट खात्याद्वारे शेअर्समध्ये सहज गुंतवणूक करू शकतात.

मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) यांनी यावर्षी १ नोव्हेंबर रोजी मुहूर्त ट्रेडिंग सत्राचं आयोजन केलं असून सायंकाळी ६ ते ७ या वेळेत लोकांना शेअर बाजारात गुंतवणूक करता येणार आहे. मात्र, दिवसभरात बाजारातील व्यवहार बंद राहणार आहेत. मुहूर्त ट्रेडिंग सेशनदरम्यान मार्केटच्या सर्व सेगमेंटमध्ये नॉर्मल ट्रेडिंग होतं आणि इक्विटीसह डेरिव्हेटिव्हमध्ये देखील तुम्ही ट्रेडिंग करू शकता.

कधी झाली सुरुवात?

१९५७ साली मुंबई शेअर बाजारात (बीएसई) मुहूर्त ट्रेडिंगला सुरुवात झाली. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर (एनएसई) मुहूर्त ट्रेडिंग १९९२ मध्ये सुरू झालं. इलेक्ट्रॉनिक डिमॅट खाती सुरू होण्यापूर्वी ट्रेडर्स एक्स्चेंजमध्ये येऊन मुहूर्त ट्रेडिंगमध्ये सहभागी होत असत.

कशी होती कामगिरी?

गेल्या ११ वर्षांच्या मुहूर्त ट्रेडिंगचा इतिहास पाहिला तर शेअर बाजाराने ११ पैकी ९ सत्रांमध्ये सकारात्मक कामगिरी केली आहे. २०१८ पासून मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी बाजारानं सातत्यानं सकारात्मक परतावा दिलाय. केवळ २०१६ आणि २०१७ मध्ये त्यानं नकारात्मक परतावा दिला.

२०२३ च्या मुहूर्त ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स ३५५ अंकांनी वधारून ६५,२५९ वर आणि निफ्टी ५० निर्देशांक १०० अंकांनी म्हणजे ०.५२ टक्क्यांनी वधारून १९,५२५ वर होता. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सनं या कालावधीत लार्जकॅपला मागे टाकलं, बीएसई मिडकॅप निर्देशांकानं ०.६७ टक्के आणि बीएसई स्मॉलकॅप निर्देशांकाने १.१४ टक्के परतावा दिला.

Web Title: Muhurat Trading Muhurat trading happens during Diwali its history is special for stock market know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.