Join us

फक्त १० रुपयांत 'स्पिनर' गळाला लागला! मुकेश अंबानी आणि मुथय्या मुरलीधरनमध्ये ही कसली डील झाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 20:04 IST

रिलायन्सची एफएमसीजी कंपनी RCPL ने मुरलीधरनसोबत ही मोठी डील केली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांनी क्रिकेट सामन्यांचे प्रसारणाचे हक्क काय मिळविले आणि आता तर ते १० रुपयांत सर्वच खेळांवर राज्य करण्यासाठी निघाले आहेत. यासाठी अंबानी यांनी श्रीलंकेचा जगविख्यात गोलंदाज मुथय्या मुरलीधरनसोबत हात मिळवणी केली आहे. हे दोघेही मिळून स्पोर्ट्स ड्रिंक बनविणार आहेत आणि ते विकणार आहेत. सध्याच्या स्पर्धेत त्यांनी ठेवलेली किंमत एवढी कमी आहे की समोरच्या कंपन्यांचेही धाबे दणाणले आहेत. 

रिलायन्सची एफएमसीजी कंपनी RCPL ने मुरलीधरनसोबत ही मोठी डील केली आहे. या ड्रिंकचे नावही स्पिनर असे ठेवण्यात आले आहे. कुंबळे, शेन वॉर्न, मुरलीधरन यांची जगातील सर्वात खतरनाक स्पिनर गोलंदाजांमध्ये गिनती होते. गेटोरेड आणि पावरेड सारखे ब्रँड या स्पोर्ट्स ड्रिंकच्या व्यवसायात भक्कम पाय रोवून आहेत. त्यांच्यापेक्षा निम्मी किंमत ठेवल्याने अंबानी जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

या ड्रिंकच्या बॉटल १५० मिली असणार आहेत. गेटोरेड आणि पावरेड हे ब्रँड पेप्सिको आणि कोकाकोला सारख्या दिग्गज कंपन्या बनवितात. अंबानींनी रिलायन्सचा पाठिंबा आणि मुरलीधरनचा चेहरा व स्पिनर हे नाव यांचे अजब कॉम्बिनेशन तयार केले आहे. 

मुरलीधरनची कर्नाटकच्या म्हैसुरमध्ये बेवरेजची फॅक्टरी आहे. मुथिया बेव्हरेजेससोबत रिलायन्सन् आधीच करार केला आहे. आता तिथे स्पिनरचे उत्पादन आणि पॅकिंग सुरु झाले आहे. कॅम्पा शीतपेयांच्या बाटल्याही येथे भरल्या जातात. 

अंबानी कोरोना काळापासून वेगवेगळ्या क्षेत्रात उतरत आहेत. कंपन्या विकत घेत आहेत. हे स्पिनर लवकरच बाजारात लाँच केले जाणार आहे. या ड्रिकसाठी अंबानी यांनी नुकतीच SIL ही कंपनी ताब्यात घेतली आहे.  

टॅग्स :मुकेश अंबानी