Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुकेश अंबानी बनले सर्वात श्रीमंत भारतीय! हुरुन श्रीमंतीच्या यादीत अव्वल; दुसऱ्या क्रमांकावर अदानी

मुकेश अंबानी बनले सर्वात श्रीमंत भारतीय! हुरुन श्रीमंतीच्या यादीत अव्वल; दुसऱ्या क्रमांकावर अदानी

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना मागे टाकत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत भारतीय बनले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 01:32 PM2023-10-11T13:32:45+5:302023-10-11T13:33:05+5:30

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना मागे टाकत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत भारतीय बनले आहेत.

Mukesh Ambani became the richest Indian! Hurun tops the list of riches; Second is Adani | मुकेश अंबानी बनले सर्वात श्रीमंत भारतीय! हुरुन श्रीमंतीच्या यादीत अव्वल; दुसऱ्या क्रमांकावर अदानी

मुकेश अंबानी बनले सर्वात श्रीमंत भारतीय! हुरुन श्रीमंतीच्या यादीत अव्वल; दुसऱ्या क्रमांकावर अदानी

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना मागे टाकत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत भारतीय बनले आहेत. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या '३६० वन वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२३' मध्ये अंबानी ८.०८ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह अव्वल स्थानावर आहेत.

आठवड्यातून ४ दिवस काम, ३ दिवस आराम; भारतातील 'या' कंपनीची ऑफर, फक्त १ अट ठेवली

या यादीत गौतम अदानी दुसऱ्या स्थानावरआले आहेत, सध्या त्यांची संपत्ती ४.७४ लाख कोटी रुपये आहे. हिंडेनबर्ग संशोधन अहवालामुळे अदानींच्या एकूण संपत्तीत लक्षणीय घट झाली आहे. भारतातील सर्वात श्रीमंत लोकांची हुरुन भारताची ही १२ वी वार्षिक रँकिंग आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक सायरस एस पूनावाला यांनी २.७८ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह तिसरे स्थान कायम ठेवले आहे. एचसीएलचे शिव नाडर २.२८ लाख कोटींच्या संपत्तीसह चौथ्या स्थानावर आहेत आणि गोपीचंद हिंदुजा १.७६ लाख कोटींच्या संपत्तीसह पाचव्या स्थानावर आहेत.

सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजचे संस्थापक आणि नेते दिलीप संघवी १.६४ लाख कोटींच्या संपत्तीसह सहाव्या स्थानावर राहिले. एलएन मित्तल, राधाकिशन दमानी, कुमार मंगलम बिर्ला आणि नीरज बजाज यांचाही टॉप-10 यादीत समावेश आहे.

२० वर्षांचा कैवल्य हा सर्वात तरुण अब्जाधीश आहे
या यादीत एकूण २५९ अब्जाधीश आहेत. त्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत ३८ अधिक आहे. झेप्टोचे संस्थापक कैवल्य वोहरा (२०) या यादीतील सर्वात तरुण अब्जाधीश आहेत. हुरुन लिस्ट लाँच झाल्यानंतर प्रथमच या यादीत समाविष्ट असलेल्या श्रीमंतांची एकत्रित संपत्ती १०९ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. हे सिंगापूर, यूएई आणि सौदी अरेबियाच्या एकत्रित जीडीपीपेक्षा जास्त आहे.

श्रीमंतांच्या संपत्तीत ८.५% वाढ

यादीत समाविष्ट असलेल्या श्रीमंतांच्या संचित संपत्तीत ८.५% वाढ झाली आहे, तर सरासरी संपत्ती ९.३% ने घटली आहे. अहवालात असेही म्हटले आहे की सुमारे १,०५४ व्यक्तींच्या संपत्तीत गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे किंवा ती तशीच राहिली आहे. यापैकी २७८ नवीन चेहरे आहेत, तर २६४ लोकांच्या संपत्तीत घट झाली आहे आणि ५५ लोक यादीतून बाहेर पडले आहेत.

Web Title: Mukesh Ambani became the richest Indian! Hurun tops the list of riches; Second is Adani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.