मुंबई: रिलायन्स उद्योग समूहाचे चेयरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या संपत्तीत गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाढ होत आहे. मुकेश अंबानी आता जगातील सर्वात धनाढ्य व्यक्तींच्या यादीत पाचव्या स्थानावर पोहोचले आहेत. त्यांनी जगातील प्रख्यात गुंतवणूकदार आणि बर्कशायर हॅथवेचे सीईओ वॉरन बफे यांना मागे टाकलं आहे. जगातील पहिल्या पाच श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश झालेले मुकेश अंबानी हे आशियातील एकमेव उद्योगपती आहेत.गेल्या ८ दिवसांत मुकेश अंबानींच्या संपत्ती तब्बल २.६ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. गेल्याच आठवड्यात, १४ जुलैला अंबानी श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सहाव्या क्रमांकावर पोहोचले होते. मात्र आठवड्याभरात संपत्तीत मोठी वाढ झाल्यानं आता त्यांनी पाचवं स्थान पटकावलं आहे. फोर्ब्स बिलेनियर्स लिस्टनुसार (Forbs Billionaire List) मुकेश अंबानींची एकूण संपत्ती ७५ अब्ज डॉलर इतकी आहे. मुकेश अंबानींच्या संपत्तीसोबतच रिलायन्सच्या बाजार भांडवलातही सातत्यानं वाढ होत आहे. रिलायन्सचं बाजार भांडवल सध्या १२,७०,४८०.०६ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.रिलायन्सचया समभागांच्या किमतीत सातत्यानं वाढ होत आहे. मार्च महिन्यापासून रिलायन्स उद्योग समूहाच्या समभागांच्या किमती दुपटीनं वाढल्या आहेत. आज रिलायन्स उद्योग समूहाच्या समभागाच्या किमतीत १.६४ टक्क्यांची (३२.२५ रुपयांची) वाढ पाहायला मिळाली. त्यामुळे रिलायन्सच्या समभागाची किंमत २००४.१० रुपयांवर पोहोचली.जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ऍमेजॉनचे सीईओ जेफ बेजोस पहिल्या स्थानी आहेत. त्यांची संपत्ती १८५.८ अब्ज डॉलर इतकी आहे. त्यानंतर मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांचा क्रमांक लागतो. त्यांच्या संपत्तीचं मूल्य ११३.१ अब्ज डॉलर इतकं आहे. या यादीत बर्नार्ड अर्नाल्ट अँड फॅमिली तिसऱ्या स्थानी आहे. त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीचं मूल्य ११२ अब्ज डॉलर आहे. यानंतर फेसबुकचे सीईओ मार्क झकरबर्ग यांचा क्रमांक लागतो. त्यांच्याकडे ८९ अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती आहे."नियम फक्त ईदसाठी आहेत का?; मग मोदींनाही राम मंदिराचं प्रतिकात्मक भूमिपूजन करायला सांगा"आमचं मुख्यालय ३० कोटींत विकत घ्या; भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या ऑफरला काँग्रेसकडून जबरदस्त उत्तरभाजपा अनोख्या पद्धतीनं निषेध करणार; शरद पवारांना 'जय श्रीराम' लिहिलेली १० लाख पत्रं पाठवणार
श्रीमंतांच्या यादीत पाचव्या स्थानी पोहोचले मुकेश अंबानी; 8 दिवसांत छप्परफाड कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 9:43 PM