लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी हे आशियातील दुसरे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले असून, संपत्तीच्या बाबतीत त्यांनी चीनचे व्यावसायिक ली का शिंग यांना मागे टाकले आहे.
ब्लूम्बर्ग इंडेक्सनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या संपत्तीमध्ये या वर्षी १२.१ अब्ज डॉलर इतकी प्रचंड वाढ झाली आहे. रिलायन्सच्या शेअर्सने उसळी घेतल्यामुळे त्यांच्या नावे हा नवा विक्रम झाला आहे. त्यांची एकूण संपत्ती ३४.८ अब्ज डॉलर झाली आहे, तर चीनचे व्यावसायिक ली का शिंग यांची एकूण संपत्ती ३३.३ अब्ज डॉलर इतकी आहे.
एक वर्षात शिंग यांच्या संपत्तीत ४.८५ अब्ज डॉलर्सची भर पडली. रिलायन्सने १५00 रुपये किमतीच्या फोनची घोषणा केल्याने रिलायन्सचा शेअर बाजारातील स्तर उंचावला.
अंबानींनी जिओसाठी ३१ बिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे. रिलायन्सची ९0 टक्के कमाई पेट्रोकेमिकल्स व रिफायनिंगमधून होते. त्यासोबतच रिटेल, मीडिया व नैसर्गिक गॅसच्या मायनिंगमधूनही पैसा मिळतो.
मुकेश अंबानी ठरले दुसरे आशियाई श्रीमंत
रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी हे आशियातील दुसरे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले असून, संपत्तीच्या बाबतीत त्यांनी चीनचे व्यावसायिक ली का शिंग यांना मागे टाकले आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 12:52 AM2017-08-02T00:52:27+5:302017-08-02T00:52:40+5:30