Budget 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Mukesh Ambani: अर्थसंकल्पापूर्वी मुकेश अंबानी यांच्या संपत्ती मोठी वाढ; इतक्या अब्ज डॉलरची कमाई...

Mukesh Ambani: अर्थसंकल्पापूर्वी मुकेश अंबानी यांच्या संपत्ती मोठी वाढ; इतक्या अब्ज डॉलरची कमाई...

Bloomberg Billionaires Index नुसार अंबानी आता 90.6 अब्ज डॉलर संपत्तीसह जगातील 11वे श्रीमंत व्यक्ती आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 11:14 AM2022-02-01T11:14:08+5:302022-02-01T11:14:35+5:30

Bloomberg Billionaires Index नुसार अंबानी आता 90.6 अब्ज डॉलर संपत्तीसह जगातील 11वे श्रीमंत व्यक्ती आहेत.

Mukesh Ambani: Big increase in Mukesh Ambani's wealth before budget; earns 19 thousand Crore | Mukesh Ambani: अर्थसंकल्पापूर्वी मुकेश अंबानी यांच्या संपत्ती मोठी वाढ; इतक्या अब्ज डॉलरची कमाई...

Mukesh Ambani: अर्थसंकल्पापूर्वी मुकेश अंबानी यांच्या संपत्ती मोठी वाढ; इतक्या अब्ज डॉलरची कमाई...

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचा अर्थसंकल्प (Union Budget 2022) सादर करत आहेत. वाढती महागाई, बेरोजगारांची वाढलेली संख्या, घसरता रुपया, निर्गुंतवणूक, खनिज तेलाचे वाढत असलेले दर अशी अनेक आव्हाने सीतारामन यांच्यासमोर आहेत. या अर्थसंकल्पावर संपूर्ण देशाची नजर असणार आहे. दरम्यान, आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना अर्थसंकल्पाच्या आधी एक मोठा लाभ झाला आहे.

अर्थसंकल्पाच्या एक दिवश आधीच मुकेश अंबानींच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 2.51 अब्ज डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये 18 हजार 717 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर सोमवारी 2.18 टक्क्यांनी वाढले. Bloomberg Billionaires Index नुसार अंबानी आता 90.6 अब्ज डॉलर संपत्तीसह जगातील 11वे श्रीमंत व्यक्ती आहेत.

वार्षिक कमाईत अदानी पुढे
मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत झालेल्या या मोठ्या वाढीमुळे ते गौतम अदानी यांच्या खूप पुढे गेले आहेत. Bloomberg Billionaires Index नुसार सोमवारी अदानी यांच्या संपत्तीत 5.68 कोटी डॉलर वाढ झाली. अदानी यांची एकूण संपत्ती 85.7 अब्ज डॉलर असून, ते अंबानी यांच्यानंतर 12व्या स्थानावर आहेत. 

एलन मस्क अव्वस्थानी
Bloomberg Billionaires Index नुसार वार्षिक कमाईच्या बाबतीत सध्या गौतम अदानी अव्वल स्थानी आहेत. या वर्षी अदानीच्या संपत्तीत 9.16 अब्ज डॉलर इतकी वाढ झाली आहे. तर, वॉरेन बफे यांची संपत्ती 4.47 अब्ज डॉलरने वाढली आहे. तर, टेस्लाचे सीईओ मस्क यांची संपत्तीत सोमवारी 21.4 अब्ज डॉलर इतकी वाढ झाली. ते 242 अब्ज डॉलरसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. अमेझॉनचे जेफ बेजोस यांची संपत्ती 175 अब्ज डॉलर इतकी असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहे. 
 

Web Title: Mukesh Ambani: Big increase in Mukesh Ambani's wealth before budget; earns 19 thousand Crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.