Join us

विकली जात आहे मुकेश अंबानी यांची ही कंपनी, 2.2 कोटी डॉलर्समध्ये डील पक्की! 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 8:56 AM

रिलायन्सच्या सब्‍स‍िडरी कंपनीने ही कंपनी ऑक्टोबर 2021 मध्ये खरेदी केली होती. महत्वाचे म्हणजे, तेलापासून रिटेल समूहापर्यंत आपली पकड घट्ट करण्यासाठी रिलायन्सच्या उपकंपनीने ही कंपनी विकत घेतली होती. 

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (Reliance Industries) आपली एक कंपनी विकण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात रिलायन्स इंडस्‍ट्रीजने सोमवारी म्हटले आहे की, आपण REC सोलर नॉर्वे AS ला ओस्‍लो लिस्टेड एल्‍केम AS ला जवळपास  22 मिलियम अमेरिकन डॉलरमध्ये विकणार आहोत. REC नॉर्वे ही REC सोलर होल्डिंगची संपूर्ण मालकी असलेली कंपनी आहे आणि ती स्कॅन्डिनेव्हियन देशात पॉलिसिलिकॉनचे उत्पादन करते.

रिलायन्सच्या सब्‍स‍िडरी कंपनीने ही कंपनी ऑक्टोबर 2021 मध्ये खरेदी केली होती. महत्वाचे म्हणजे, तेलापासून रिटेल समूहापर्यंत आपली पकड घट्ट करण्यासाठी रिलायन्सच्या उपकंपनीने ही कंपनी विकत घेतली होती. 

रिलायन्सच्या उपकंपनीनं केली डील -RIL ने स्टॉक एक्सचेन्ज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची संपूर्ण मालकी असलेली उपकंपनी REC सोलर होल्डिंग्‍स एएसने माहिती दिली आहे की, त्यांनी 14 जानेवारी 2024 रोजी आपल्या 100 रुपये प्रति शेअरच्या विक्रीसाठी एल्केम ASA सोबत डील केली आहे. REC Solar Norvey AS विकण्यासाठी 22 मिलियन अमेरिकन डॉलरची डील झाली आहे.

काय  करते कंपनी -या कंपनीची स्थापना 1904 मध्ये झाली. एल्केम एएसए एक सिलिकॉन बेस्‍ड कंपनी आहे आणि ओस्लो स्टॉक एक्सचेन्जमध्ये लिस्टेड आहे. यासंदर्भात कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आरईसी नॉर्वे ही आरईसी सोलर होल्डिंग्स एएसची संपूर्ण मालकी असलेली उपकंपनी आहे. या कंपनीत केर्फ-आधारित पॉलिसिलिकॉनचे उत्पादन होते. या कंपनीत हे पॉलिसिलिकॉन व्यवसाय पुढे चालू ठेवेल.

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्सव्यवसाय