Lokmat Money > बिझनेस न्यूज > १९९ रुपयांत कपडे.. फास्ट फॅशनच्या जगात अंबानींचा मोठा डाव; ज्युडिओ, नायका धास्तावले

१९९ रुपयांत कपडे.. फास्ट फॅशनच्या जगात अंबानींचा मोठा डाव; ज्युडिओ, नायका धास्तावले

fast fashion Shein : उद्योगपती मुकेश अंबानी जिओनंतर आता वेगवान फॅशनच्या जगात खळबळ माजवणार आहेत. त्यांच्या कपड्यांची किंमत फक्त १९९ रुपयांपासून सुरू होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 14:04 IST2025-02-10T13:55:40+5:302025-02-10T14:04:40+5:30

fast fashion Shein : उद्योगपती मुकेश अंबानी जिओनंतर आता वेगवान फॅशनच्या जगात खळबळ माजवणार आहेत. त्यांच्या कपड्यांची किंमत फक्त १९९ रुपयांपासून सुरू होते.

Mukesh Ambani eyes fast fashion supremacy with Shein Are Trent, Nykaa at risk? | १९९ रुपयांत कपडे.. फास्ट फॅशनच्या जगात अंबानींचा मोठा डाव; ज्युडिओ, नायका धास्तावले

१९९ रुपयांत कपडे.. फास्ट फॅशनच्या जगात अंबानींचा मोठा डाव; ज्युडिओ, नायका धास्तावले

fast fashion Shein : उद्योगपती मुकेश अंबानी यांनी ज्या क्षेत्रात पाऊल ठेवलं, तिथं आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. जिओ हे अलीडकच्या वर्षातील सर्वात मोठं उदाहरण आहे. जिओ सेवा सुरू झाल्यानंतर किमान डझनभर कंपन्यांनी आपला गाशा गुंडाळला. आजही जिओ कंपनी ग्राहकांच्या बाबतीत आघाडीवर आहे. टेलिकॉमनंतर मुकेश अंबानी आता फास्ट फॅशनच्या जगात खळबळ माजवण्याच्या तयारीत आहेत. रिलायन्स रिटेलने देशातील फास्ट फॅशन क्षेत्रात एन्ट्री मारली आहे. त्यांनी शीन हा चीनी ब्रँड भारतात पुन्हा लाँच केला आहे. या ब्रँडच्या कपड्यांची किंमत फक्त १९९ रुपयांपासून सुरू होते. या निर्णयानंतर टाटा समूहाच्या झुडिओ आणि नायका फॅशन या दोन्ही ब्रँड धास्तावले आहेत.

रिपोर्टनुसार, देशातील फास्ट फॅशन मार्केट आर्थिक वर्ष २०३१ पर्यंत ५० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचू शकते. ट्रेंडी फॅशन, आकर्षक किमती आणि रिलायन्सची साथ मिळाल्याने 'शीन' बाजारात आपलं बस्तान बसवू शकतो. शीनच्या लाँचिंग आणि संभाव्य लोकप्रियतेमुळे रिलायन्सचा रिटेल महसूल आणि EBITDA अंदाज वाढण्याची अपेक्षा आहे. शीनमुळे रिलायन्सला खूप फायदा होऊ शकतो.

शीन पहिल्यापासूनच भारतात लोकप्रिय
शीन हा चिनी ब्रँड आधीपासूनच भारतात लोकप्रिय आहे. ५ वर्षांपूर्वी भारत-चीन देशातील तणावामुळे याला बॅन करण्यात आलं होतं. त्यावेळी दररोद २० ते ५०,००० ऑर्डर मिळत होत्या. रिलायन्स रिटेलने १ फेब्रुवारी रोजी शीन इंडिया फॅशन अ‍ॅप पुन्हा लाँच केलं आहे. तेव्हापासून, गुंतवणूकदार उद्योगावरील संभाव्य परिणामाचे मूल्यांकन करत आहेत. शीनने अल्ट्रा-फास्ट फॅशनची सुरुवात केली आहे. जिथे नवीन डिझाईन्स डेटा ॲनालिटिक्स आणि कमी किमतीच्या उत्पादनाचा वापर करून अधिक वेगाने बाजारात आणले जातात.

शीन घेतोय एआयची मदत
शीन ब्रँड आपले कपडे कमीत कमी वेळेत बाजारात पोहचवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. ऑटोमेशन, एआय आणि सप्लाय चेनच्या मदतीने उत्पादने स्वस्त आणि जलद तयार होत आहेत. पुरवठादारांसोबत शीनच्या मजबूत संबंधांमुळे कमी कालावधीत जास्तीत जास्त ऑर्डर वितरीत केल्या जात आहेत.

नायका, ट्रेंट, ज्युडिओवर धास्तावले?
शीनच्या वेगवान सेवेमुळे नायका, ट्रेंट, ज्युडिओ हे लोकप्रिय ब्रँड धास्तावले आहेत. शीनच्या लाँचचा ट्रेंटवरही परिणाम झाला आहे. कारण, त्याचे शेअर्स ४ फेब्रुवारी रोजी ६% पेक्षा जास्त घसरले. इतर वेगवान फॅशन रिटेलर्ससाठी १-२ आठवड्यांच्या तुलनेत शीनचे उत्पादन चक्र ५-७ दिवस आहे. म्हणजे सात दिवसात शोरूममध्ये नवीन फॅशनचे कपडे येतात.

Web Title: Mukesh Ambani eyes fast fashion supremacy with Shein Are Trent, Nykaa at risk?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.