Lokmat Money > बिझनेस न्यूज > युद्धभूमी ठरली! अंबानी-अदानींची एकमेकांच्या क्षेत्रात एंट्री; आता आरपारची लढाई

युद्धभूमी ठरली! अंबानी-अदानींची एकमेकांच्या क्षेत्रात एंट्री; आता आरपारची लढाई

आशियातील दोन दिग्गज आणि धनाढ्य उद्योगपती आमनेसामने; उद्योगक्षेत्रात उत्कंठावर्धक संघर्ष पाहायला मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 09:03 AM2021-06-27T09:03:17+5:302021-06-27T09:05:18+5:30

आशियातील दोन दिग्गज आणि धनाढ्य उद्योगपती आमनेसामने; उद्योगक्षेत्रात उत्कंठावर्धक संघर्ष पाहायला मिळणार

mukesh ambani gautam adani business reliance industries adani group adani and ambani | युद्धभूमी ठरली! अंबानी-अदानींची एकमेकांच्या क्षेत्रात एंट्री; आता आरपारची लढाई

युद्धभूमी ठरली! अंबानी-अदानींची एकमेकांच्या क्षेत्रात एंट्री; आता आरपारची लढाई

मुंबई: आशियातील सर्वात धनाढ्य उद्योगपती असलेले मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यामध्ये आता थेट मुकाबला होणार आहे. अंबानी आणि अदानी यांनी एकमेकांच्या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतल्यानं पुढील काही वर्षांत त्यांच्यात आरपारची लढाई पाहायला मिळू शकते. अंबानी आणि अदानी दोघेही गुजरातचे आहेत. त्यामुळे या संघर्षात नेमकी कोणाची सरशी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुकेश अंबानींकडून हरित उर्जा योजना सादर
पेट्रोकेमिकल्सचे सम्राट असलेले मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या ४४ व्या वार्षिक बैठकीत हरित उर्जा क्षेत्रात येण्याची घोषणा केली. अंबानी या क्षेत्रात ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहेत. देशातील ऊर्जा क्षेत्रात प्रामुख्यानं कोळशाचा वापर होतो. आता अंबानींनी हरित ऊर्जेकडे लक्ष केंद्रीत केल्यानं ऊर्जा क्षेत्रात निर्णायक बदल अपेक्षित आहेत.

टोटल एनर्जीसोबत अदानी
अंबानी यांनी आता हरित ऊर्जा क्षेत्रात पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला. मात्र अदानी आधीपासूनच या क्षेत्रात कार्यरत आहेत. फ्रान्सची कंपनी टोटल एनर्जीनं अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये २० टक्के हिस्सा खरेदी केला आहे. कंपनीनं अदानींच्या २५ गिगावॅट सौरऊर्जा पोर्टफोलिओंमध्ये थेट गुंतवणूक केली आहे. तीन वर्षांत त्यात ५० टक्के वाढ झाली आहे.

अदानी पीव्हीसी उद्योगात
अदानी समूहाची अदानी एंटरप्रायझेस पॉली विनी क्लोराईड (पीव्हीसी) उद्योगात उतरणार आहे. यात कंपनी २९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. अंबानींची रिलायन्स आधीपासूनच या उद्योगात आहे. अदानी यांनी वर्षाकाठी २ हजार टन क्षमतेचं उद्दिष्ट ठेवलं आहे. त्यासाठी ते ऑस्ट्रेलिया, रशिया आणि इतर देशांमधून कोळसा आयात करणार आहेत.

Web Title: mukesh ambani gautam adani business reliance industries adani group adani and ambani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.