Lokmat Money > बिझनेस न्यूज > Mukesh Ambani, Gautam Adani: अंबानी अदानींनी केवळ आपलेच खिसे भरले नाहीत, गुंतवणूकदारांचेही 10 लाखांचे 1.7 कोटी केले

Mukesh Ambani, Gautam Adani: अंबानी अदानींनी केवळ आपलेच खिसे भरले नाहीत, गुंतवणूकदारांचेही 10 लाखांचे 1.7 कोटी केले

Mukesh Ambani, Gautam Adani Companies Wealth: देशातील दोन गर्भश्रीमंत असलेल्या मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या कंपन्यांनी गुंतवणूकदारांवर पैशांचा तुफान पाऊस पाडला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 16:13 IST2021-12-15T16:11:26+5:302021-12-15T16:13:36+5:30

Mukesh Ambani, Gautam Adani Companies Wealth: देशातील दोन गर्भश्रीमंत असलेल्या मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या कंपन्यांनी गुंतवणूकदारांवर पैशांचा तुफान पाऊस पाडला आहे.

Mukesh Ambani, Gautam Adani not only filled his pockets, but also made investors invest Rs 1.7 crore from Rs 10 lakh. | Mukesh Ambani, Gautam Adani: अंबानी अदानींनी केवळ आपलेच खिसे भरले नाहीत, गुंतवणूकदारांचेही 10 लाखांचे 1.7 कोटी केले

Mukesh Ambani, Gautam Adani: अंबानी अदानींनी केवळ आपलेच खिसे भरले नाहीत, गुंतवणूकदारांचेही 10 लाखांचे 1.7 कोटी केले

देशातील दोन गर्भश्रीमंत असलेल्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या कंपन्यांनी गुंतवणूकदारांवर पैशांचा तुफान पाऊस पाडला आहे. मोतीलाल ओस्वालच्या 26th Annual Wealth Creation Study नुसार रिलायन्स इंडस्ट्री सर्वात मोठी वेल्थ क्रिएटर झाली आहे. याचप्रकारे अदानी ट्रान्समिशन (Adani Transmission) ने सर्वाधिक वेगाने गुंतवणूकदारांची झोळी भरली आहे. तसेच अदानी एन्टरप्रायझेस (Adani Enterprises) सतत चांगले प्रदर्शन करणारी कंपनी राहिली आहे. 

अभ्यासानुसार देशातील सर्वाधिक मुल्याची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने सतत तिसऱ्यांदा सर्वात मोठी वेल्थ क्रिएटर राहण्याचा मान पटकावला आहे. 2016 ते 2021 च्या मध्ये या कंपनीने 9.7 लाख कोटी रुपयांची संपत्ती गोळा केली आहे. हे आजवरचे सर्वाधिक रेकॉर्ड आहे. कंपनीने आपलेच रेकॉर्ड तोडले आहे. कंपनीने याआधी 2014 ते 2019 या काळात 5.6 लाख कोटी रुपये कमावले होते. या दरम्यान कंपनीचा नफा वर्षाला 8 टक्क्यांनी वाढला, तर शेअरची किंमत वर्षाला 31 टक्क्यांच्या चक्रवाढ दराने वाढली. या काळात सर्वाधिक वेल्थ बनविणाऱ्या कंपन्यांच्या यादीत टीसीएस, एचडीएफसी बँक आणि हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्या आहेत. 

2016 ते 2021 मध्ये सर्वाधिक वेगाने वेल्थ बनविणाऱ्या कंपन्यांच्या यादीत अदानी ट्रान्समिशन पहिल्या क्रमांकावर आहे. या कंपनीने 93 टक्क्यांची वार्षिक चक्रवाढ दराने संपत्ती बनविली आहे. दुसऱ्या क्रमांकावर दीपक नायट्राईट आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर अदानी एंटरप्रायझेस आहे. या कंपनीने 86 टक्के वार्षिक च्रकवाढ दराने गुंतवणूकदारांसाठी कमाई केली आहे. जर तुम्ही 2016 मध्ये देशातील टॉप 10 फास्टेस्ट वेल्थ क्रिएटर कंपन्यांमध्ये 10 लाख रुपये गुंतविले असते तर आज त्याचे 1.7 कोटी रुपये झाले असते. या कंपन्यांनी सरासरी 77 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. या काळात सेन्सेक्सचा वेग सरासरी 14 टक्के राहिला आहे. 

या दरम्यान अदानी एन्टरप्रायझेसने मोस्ट कन्सिस्टंट आणि मोस्ट ऑल राऊंड वेल्थ क्रिएटरचे स्थान पटकावले आहे. ओसवालच्या अभ्यासानुसार 2016 ते 2021 मध्ये या कंपनीच्या शेअरनी सतत चांगले प्रदर्शन केले आहे. 86 टक्के CAGR चा रिटर्न दिला आहे. सोबतच या शेअरने ऑल राऊंड प्रदर्शन केले आहे.

Read in English

Web Title: Mukesh Ambani, Gautam Adani not only filled his pockets, but also made investors invest Rs 1.7 crore from Rs 10 lakh.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.