आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी जिओ युजर्सना एक मोठे गिफ्ट दिले आहे. जर आपण जिओ फायबर अथवा जिओएअरफायबर युजर्स असाल तर आपल्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. जिओने युजर्ससाठी एक खास ऑफर सुरू केली आहे. या ऑफर अंतर्गत, आपण २ वर्षांसाठी मोफत यूट्यूब प्रीमियम (YouTube Premium) चा आनंद घेऊ शकता. यूट्यूब प्रीमियम ही एक सशुल्क सेवा आहे. ही सुविधा घेण्यासाठी ग्राहकांना दर महिन्याला १४९ रुपये मोजावे लागतात. मात्र, जिओच्या या ऑफरमुळे युजर्सचे २ वर्षात अंदाजे ३६०० रुपये वाचवू शकता. यामुळे ही ऑफर विशेष आहे. तर जाणून घेऊयात, जिओच्या या ऑफरसंदर्भात सविस्तर...
काय आहे ऑफर...? -
रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन ऑफर लाँच केली आहे. या ऑफर अंतर्गत, जिओ फायबर आणि जिओएअरफायबर चे काही खास प्लॅन घेणाऱ्या ग्राहकांना २४ महिने अर्थात २ वर्षांसाठी YouTube प्रीमियम मेंबरशिप पूर्णपणे मोफत मिळेल. यूट्यूब प्रीमियम मध्ये, आपल्याला कोणत्याही जाहिरातीशिवाय व्हिडिओ पाहणे, व्हिडिओ डाउनलोड करणे आणि बॅकग्राउंडमध्ये म्यूझिक ऐकण्या यासारख्या अनेक सुविधा मिळतील. याशिवाय, आपण YouTube Music Premium वर १०० मिलियनहून अधिक गाणीही ऐकू शकता.
कोण-कोणत्या प्लॅन्सवर मिळणार ही ऑफर? -
ही ऑफर 888 रुपये, 1199 रुपये, 1499 रुपये, 2499 रुपये आणि 3499 रुपयांच्या प्लॅन्सवर मिळेल. जर आपण यांपैकी कोणताही प्लॅन घेतला तर आपल्याला यूट्यूब प्रीमियमचे 24 महिन्यांचे फ्री सब्सक्रिप्शन मिळेल. ही ऑफर 11 जानेवारीपासून सुरू झाली आहे.
असे करा अॅक्टिव्हेट? -
ही ऑफर अॅक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला MyJio अॅपवर जावे लागेल. तेथे आपल्याला यूट्यूब प्रीमियम बॅनर दिसेल. त्यावर क्लिक करून आणि आपल्या YouTube अकाउंटने लॉग इन करून आपण या ऑफरचा लाभ घेऊ शकता. ही सेवा जिओच्या सेट-टॉप बॉक्ससह सर्व डिव्हाइसवर अॅक्सेस केली जाऊ शकते.