Lokmat Money > बिझनेस न्यूज > जे मुकेश अंबानी आपल्या मुलाचं एवढं जंगी लग्न करतायेत, त्यांचा जन्म झालाय जगातील अत्यंत गरीब देशात! माहीत आहे कुठे?

जे मुकेश अंबानी आपल्या मुलाचं एवढं जंगी लग्न करतायेत, त्यांचा जन्म झालाय जगातील अत्यंत गरीब देशात! माहीत आहे कुठे?

माध्यमांतील वृत्तांनुसार, पाहुण्यांना आणण्या आणि नेण्यासाठी तब्बल 100 हून अधिक खासगी जेट भाड्याने घेण्यात आले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 06:28 PM2024-07-12T18:28:59+5:302024-07-12T18:29:28+5:30

माध्यमांतील वृत्तांनुसार, पाहुण्यांना आणण्या आणि नेण्यासाठी तब्बल 100 हून अधिक खासगी जेट भाड्याने घेण्यात आले आहेत.

Mukesh Ambani most expensive wedding of his son, was born in one of the poorest country in world country in the world Yemen | जे मुकेश अंबानी आपल्या मुलाचं एवढं जंगी लग्न करतायेत, त्यांचा जन्म झालाय जगातील अत्यंत गरीब देशात! माहीत आहे कुठे?

जे मुकेश अंबानी आपल्या मुलाचं एवढं जंगी लग्न करतायेत, त्यांचा जन्म झालाय जगातील अत्यंत गरीब देशात! माहीत आहे कुठे?


मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न अत्यंत थाटात पार पडत आहे. हा विवाह भारतातील सर्वात महागड्या विवाहांपैकी एक मानला जात आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये हा विवाह सोहळा पार पडत आहे. या लग्नासाठी देश आणि परददेशातूनही अनेक दिग्गज मंडळी येत आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, पाहुण्यांना आणण्या आणि नेण्यासाठी तब्बल 100 हून अधिक खासगी जेट भाड्याने घेण्यात आले आहेत.

एवढेच नाही तर या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना भेटवस्तूच्या स्वरुपात सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने, महागडे परफ्यूम आदी मौल्यवान वस्तूही दिल्या जात आहेत. मात्र, भारतातील या सर्वात श्रीमंत व्यक्तीचा अर्थात मुकेश अंबानी यांचा जन्म जगातील एका अत्यंत गरीब देशात झाला आहे, हे आपल्याला माहीत आहे का? या देशातील ९९ टक्के लोक मुस्लीम आहेत. हा देश जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक आहे.

महत्वाचे म्हणजे, मुकेश अंबानी यांचा जन्म भारतात झालेला नाही. तर त्यांचा जन्म 19 एप्रिल 1957 रोजी येमेनच्या एडन शहरात झाला. तेव्हा त्यांचे वडील धीरूभाई अंबानी हे येमेनमध्ये काम करत होते. मुकेश अंबानी यांच्या जन्मानंतर लगेचच त्यांचे कुटुंब भारतात परतले. मुकेश अंबानी हे मुंबईत लहानाचे मोठे झाले. त्यांनी मुंबई विद्यापीठातून केमिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी मिळवली. यानंतर त्यांनी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीएही केले आहे.

मुकेश अंबानी यांनी 1985 मध्ये नीता यांच्यासोबत लग्न केले. त्यांना आकाश, ईशा आणि अनंत अशी तीन मुले आहेत. मुकेश अंबानी हे आज भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ते देशातील सर्वात मौल्यवान कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे (RIL) प्रमुख आहेत.

सर्वात गरीब देशांच्या यादीत येमेन -
अनंतचे लग्न भारतातील सर्वात महागड्या लग्नांपैकी एक असले तरी, मुकेश अंबानी यांचा जन्म जेथे झाला, तो येमेन देश आज जगातील सर्वात गरीब देशांच्या यादीत गणला जातो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) 2023 च्या आकडेवारीनुसार, येमेन हा जगातील सर्वात गरीब देशांच्या यादीत 11 व्या स्थानावर आहे. महत्वाचे म्हणजे, IMF च्या 2024 च्या अंदाजानुसार, 1,996.475 डॉलरच्या दरडोई GDP सह हा देश 9 व्या स्थानावरही घसरण्याची शक्यता आहे. येमेन हा एक मुस्लीम देश असून येथे 99 टक्क्यांहून अधिक मुस्लीम समाज आहे. तर, सुदान हा जगाततील सर्वात गरीब देश आहे.

Web Title: Mukesh Ambani most expensive wedding of his son, was born in one of the poorest country in world country in the world Yemen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.