रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले होते. परंतु आता चीनमधील वॉटर किंग म्हणून ओळखले जाणारे व्यावसायिक झोंग शॅनशॅन हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. यावर्षी त्यांचं नेटवर्थ ७०.९ अब्ज डॉलर्सवरून वाढून ७७.८ अब्ज डॉलर्स इतके झाले आहे. झोंग शॅनशॅन हे केवळ आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले नाहीत तर त्यांनी संपत्तीच्या बाबतीत चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या अलिबाबाच्या जॅक मा यांनाही मागे टाकलं आहे. शॅनशॅन हे बाटलीबंद पाणी आणि करोनावरील लस विकसित करण्याच्या व्यवसायाची जोडले गेले आहेत.
झोंग शॅनशॅन हे अब्जाधीश असून त्यांची माध्यमांमध्येही फारशी चर्चा झालेली नाही. पत्रकारिता, मशरूमचं उत्पादन, आरोग्य सेवा यांसारख्या क्षेत्रांमध्ये काम केल्यानंतर आता ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सनुसार यावर्षी झोंग यांची संपत्ती वाढून ७७.८ अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. यावर्षी त्यांच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळेच ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांच्याबाबत चीनच्या बाहेर फारच कमी लोकांना माहिती आहे. ६६ वर्षीय झोंग हे अद्यापही राजकारणात उतरले नाहीत. चीनमध्ये लोन वुल्फ म्हणूनही ते ओळखले जातात.
दोन कारणांमुळे त्यांना मोठं यश मिळाल्याचं म्हटलं जातं. पहिलं म्हणजे त्यांनी एप्रिल महिन्यात बीजिंग वेन्टाई बायोलॉजिकल फार्मसी एन्टरप्राईझ या कंपनीकडून एक लस विकसित केली. दुसरं म्हणजे काही महिन्यांतच बाटलीबंद पाणी विकणारी कंपनी नोंगफू स्प्रिंग ही हाँगकाँगमधील सर्वात लोकप्रिय कंपनी ठरली. नोंगफू कंपनीच्या शेअर्सनंही आपल्या लिस्टींगनंतर १५५ टक्क्यांची उसळी घेतली आणि वेन्टाईच्या शेअर्सनं २००० टक्क्यांपेक्षा अधिक उसळी घेतली.
मुकेश अंबानी नाही, तर चीनमधील 'ही' ठरली आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
Mukesh Ambani : ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सनुसार मुकेश अंबानींना मागे टाकत चीनमधील व्यवसायिक ठरला आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 11:43 AM2020-12-31T11:43:59+5:302020-12-31T11:47:20+5:30
Mukesh Ambani : ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सनुसार मुकेश अंबानींना मागे टाकत चीनमधील व्यवसायिक ठरला आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती.
Highlightsझोंग शॅनशॅन हे अब्जाधीश असून त्यांची माध्यमांमध्येही फारशी चर्चा झालेली नाही.पत्रकारिता, मशरूमचं उत्पादन, आरोग्य सेवा यांसारख्या क्षेत्रांमध्ये काम केल्यानंतर आता ते आशियातील सर्वाक श्रीमंत व्यक्ती ठरले