निरनिराळ्या क्षेत्रात आपलं नशीब आजमावणाऱ्या रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी आता आणखी एका नव्या क्षेत्रात एन्ट्री घेतली आहे. त्यांनी आता कॉफी क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला असून याद्वारे ते थेट टाटांच्या स्टारबक्सला टक्कर देतील. रिलायन्स ब्रँड्सनं ब्रिटीश सँडविच आणि कॉफी चेन 'प्रेथ् अ मोंजए’चं पहिलं स्टोअर भारतात लाँच केलं आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये मेकर मॅक्सिटीमध्ये हे पहिलं स्टोअर सुरू करण्यात आलंय.
दीर्घकाळात ही टाटा स्टारबक्ससाठी स्पर्धा असेल. टाटा स्टारबक्सच्या अधिक किंमतीला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजचे कार्यकारी संचालक अवनीश रॉय यांनी दिली. रिलायन्स रिटेलची उपकंपनी असलेल्या रिलायन्स ब्रँड्स लिमिटेडनं भागीदारीच्या पहिल्या वर्षात भारतात एकूण १० 'प्रेथ् अ मोंजए' स्टोअर्सची योजना आखली आहे.
भारतीय बाजारपेठेवर लक्षअलीकडेच अनेक कॉफी ब्रँड्स आणि चेननं भारतात काम सुरू केलं आहे. कॅनेडियन रेस्टॉरंट चेन टिम हॉर्टन्सनं ऑगस्ट २०२२ मध्ये दिल्ली-एनसीआरमध्ये दोन स्टोअर उघडले आहेत. येत्या तीन वर्षांत एकूण २४० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह भारतात एकूण १२० स्टोअर्स उघडण्याची त्यांची योजना आहे. दरम्यान, २०२५ पर्यंत भारतातील कॉफई मार्केट ४.२ बिलियन डॉलर्सपेक्षा अधिक होण्याची शक्यता कंपनीचे सीईओ नवीन गुरनानी यांनी व्यक्त केली होती.