नवी दिल्ली : भारतातील उपग्रह स्पेक्ट्रमच्या लिलावाच्या मुद्द्यावरून दूरसंचार क्षेत्रातील बडे उद्योगपती व त्यांचे उद्योग समूह यांच्यात सरळ २ गट पडले आहेत. स्टारलिंकचे प्रमुख इलॉन मस्क, टाटा समूह, सुनील भारती मित्तल आणि ॲमेझॉन हे एका बाजूला तर मुकेश अंबानी हे दुसऱ्या बाजूला असा संघर्ष निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे.
मस्क यांची स्टारलिंक ही कंपनी भारतात उपग्रहामार्फत इंटरनेट सेवा देण्यास उत्सुक आहे. नुकतीच न्यूयॉर्कमध्ये त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाली. त्यावेळी मस्क यांनी यासंदर्भात वक्तव्य केले हाेते. याद्वारे दुर्गम खेड्यांत इंटरनेट सेवा दिली जाऊ शकते. मात्र त्यासाठी भारत सरकारने केवळ सेवेसाठी परवानगी द्यावी, सिग्नलचे स्पेक्ट्रम अथवा एअरवेव्ह्जच्या लिलावाबाबत आग्रही असू नये, असे मस्क यांनी म्हटले. अशीच भूमिका टाटा समूह, सुनील भारती मित्तल आणि ॲमेझॉन यांनीही घेतली आहे.
काय आहे अंबानींची भूमिका?मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने मात्र मस्क यांच्या भूमिकेस विरोध केला आहे. विदेशी उपग्रह सेवा दात्यांच्या व्हाॅइस आणि डाटा सेवेसाठी स्पेक्ट्रमचा लिलाव व्हायला हवा, असे रिलायन्सने म्हटले आहे.अनेक कंपन्या ‘एसएस’साठी उत्सुक भारतातील सॅटेलाईट दूरसंचार सेवेसाठी (एसएस) स्पेक्ट्रम लिलाव महत्त्वाचा आहे. २०१० पासून सरकारने ७७ अब्ज अमेरिकी डॉलरच्या मोबाइल स्पेक्ट्रमचा लिलाव केला आहे.