Join us

आता मुकेश अंबानी 'ही' अमेरिकन कंपनी विकत घेण्याच्या तयारीत, जाणून घ्या सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 5:06 PM

Mukesh Ambani : मुकेश अंबानी हे जगातील 12 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, त्यांची संपत्ती 84.7 अब्ज डॉलर इतकी आहे.

नवी दिल्ली : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आता दुसरी कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी हे अमेरिकेतील Josh Kushner यांनी सुरू केलेली थ्राईव्ह कॅपिटल कंपनी खरेदी करण्याच्या शर्यतीत आहेत. यामध्ये मुकेश अंबानी यांच्यासह ब्राझीलचे Jorge Paulo Lemann आणि फ्रान्सचे  Xavier Niel या कंपनीतील 3.3 टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याचा विचार करत आहेत. ही हिस्सेदारी घेण्यासाठी 175 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक करावी लागणार आहे.

याशिवाय, केकेआर अँड कंपनीचे संस्थापक Henry Kravis  आणि वॉल्ट डिस्ने कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी Robert Iger हेही कंपनी खरेदी करण्याच्या शर्यतीत आहेत. थ्राईव्ह कॅपिटलने मंगळवारी मीडियमवर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या असामान्य ऑपरेटर्सनी प्रतिष्ठित संस्था निर्माण केल्या आहेत. उत्कृष्ट भौगोलिक क्षेत्रे साध्य केली आहेत, त्यांच्या आयकॉनिक ब्रँडला नवीन उंचीवर नेले आहे आणि संपूर्ण नवीन उद्योगांची निर्मिती केली आहे.

डीलनुसार, थ्राईव्ह कॅपिटलचे मूल्य 5.3 अब्ज डॉलर आहे, जे 2021 मध्ये 3.6 अब्ज डॉलर इतके होते. जेव्हा कंपनीने गोल्डमन सॅक्स ग्रुप इंकच्या युनिटला काही हिस्सा विकला होता. न्यूयॉर्कस्थित थ्राईव्ह कॅपिटलच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे. मॅनेजमेंटची एकूण मालमत्ता गेल्या वर्षी 15 अब्ज डॉलरवर पोहोचली होती. थ्राईव्हने गोल्डमन सॅक्सची हिस्सेदारी परत विकत घेतली आहे. कंपनीने मीडियमवर सांगितले की, समूहाच्या सध्याच्या होल्डिंगइतकाच हिस्सा आहे. दरम्यान, वॉल स्ट्रीट जर्नलने पहिल्यांदा हिस्सेदारी विक्रीबाबत रिपोर्ट प्रकाशित केला होता.

गुंतवणूक जगभरातील काही श्रीमंत लोकांचे कलेक्शन दाखवते. मुकेश अंबानी हे जगातील 12 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार,, त्यांची संपत्ती 84.7 अब्ज डॉलर इतकी आहे. तसेच, ब्राझीलचे सर्वात श्रीमंत व्यक्ती Lemann यांची एकूण संपत्ती 21.1 अब्ज डॉलर आहे. दुसरीकडे, निर्देशांकानुसार, Kravis यांची वैयक्तिक संपत्ती 9.5 अब्ज डॉलर आणि Niel याच्याकडे 8.1 अब्ज डॉलर संपत्ती आहे. 

टॅग्स :मुकेश अंबानीव्यवसाय