Join us

रिलायन्स जिओ देणार कमाईची जबरदस्त संधी; AGMमध्ये मोठी घोषणा करणार मुकेश अंबानी?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 5:32 PM

रिलायन्स समूह मोठा धमाका करण्याच्या तयारीत; अंबानी करणार मोठी घोषणा?

जिओच्या माध्यमातून दूरसंचार क्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या रिलायन्सनं आता आणखी एक धमाका करण्याची तयारी सुरू केली आहे. रिलायन्स समूहाच्या दोन महत्त्वाच्या कंपन्या आता शेअर बाजारात एंट्री घेणार आहेत. रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्सचा आयपीओ लवकरच येणार आहे.

हिंदू बिझनेस लाईननं दिलेल्या वृत्तानुसार, रिलायन्स समूहाच्या दोन कंपन्यांचा आयपीओ देशातला सर्वात मोठा आयपीओ असेल. सरकार लवकरच एलआयसीचा आयपीओ आणणार आहे. तो जवळपास २१ हजार कोटी रुपयांचा असेल. मात्र रिलायन्स समूहाच्या दोन कंपन्यांचा आयपीओ यापेक्षा मोठा असेल. रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेल यांचा आयपीओ प्रत्येकी ५० हजार ते ७५ हजार कोटींचा असू शकतो.

रिलायन्स समूह दोन्ही कंपन्यांना शेअर बाजारात लिस्ट करण्याच्या विचारात आहे. मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रिजच्या पुढील सर्वसाधारण सभेत याबद्दलची घोषणा करण्यात येईल. रिलायन्स जिओचा शेअर अमेरिकेतील शेअर बाजारातही (नॅसडॅक) लिस्ट केला जाऊ शकतो. जगातील मोठमोठ्या टेक कंपन्यांसाठी हा सगळ्याच मोठा शेअर बाजार आहे.

कंपनी बाजारात आधी रिलायन्स रिटेलचा आयपीओ आणू शकतं. त्यानंतर रिलायन्स जिओचा शेअर बाजारात लिस्ट करण्याचा निर्णय घेतला जाईल. डिसेंबर २०२२ पर्यंत लिस्टिंगची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते.

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्स जिओ