Lokmat Money > बिझनेस न्यूज > Mukesh Ambani : '2030 पर्यंत जगाच्या अर्थव्यवस्थेत भारताचे योगदान 60 टक्के असेल'-मुकेश अंबानी

Mukesh Ambani : '2030 पर्यंत जगाच्या अर्थव्यवस्थेत भारताचे योगदान 60 टक्के असेल'-मुकेश अंबानी

Mukesh Ambani: पुण्यात सुरू असलेल्या एशिया इकॉनॉमिक डायलॉगमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी भारताची अर्थव्यवस्था आणि ग्रीन एनर्जीबाबत अतिशय सकारात्मक विधान केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 02:49 PM2022-02-23T14:49:00+5:302022-02-23T14:49:28+5:30

Mukesh Ambani: पुण्यात सुरू असलेल्या एशिया इकॉनॉमिक डायलॉगमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी भारताची अर्थव्यवस्था आणि ग्रीन एनर्जीबाबत अतिशय सकारात्मक विधान केले आहे.

Mukesh Ambani | Pune | Asia Economic Dialogue2022 | 'India's contribution to world economy will be 60 per cent by 2030', Says Mukesh Ambani | Mukesh Ambani : '2030 पर्यंत जगाच्या अर्थव्यवस्थेत भारताचे योगदान 60 टक्के असेल'-मुकेश अंबानी

Mukesh Ambani : '2030 पर्यंत जगाच्या अर्थव्यवस्थेत भारताचे योगदान 60 टक्के असेल'-मुकेश अंबानी

पुणे: पुण्यात सुरू असलेल्या एशिया इकॉनॉमिक डायलॉगमध्ये (AED) रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी (Mukesh Mabani) यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत अतिशय सकारात्मक विधान केले आहे. पुणे इंटरनेशनल सेंटर पॉलिसी रिसर्च थिंक टँक आणि परराष्ट्र मंत्रालयाने आयोजित केलेला आशिया इकॉनॉमिक डायलॉग 23 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. यावेळी या शिखर परिषदेची थीम 'पँडेमिक पोस्ट वर्ल्ड इन रेझिलिएंट ग्लोबल ग्रोथ' अशी ठेवण्यात आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​एमडी आणि अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी बुधवारी या शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित केले.

भारत जगातील सर्वात मोठी बाजारपेठ
पीआयसीचे अध्यक्ष रघुनाथ माशेलकर यांच्याशी झालेल्या संभाषणात मुकेश अंबानी म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग जगातील सर्वात वेगवान आहे. आपल्याकडे जगातील सर्वात मोठी ग्राहक बाजारपेठ आह. या बाजारपेठेचया आधारे जगाच्या अर्थव्यवस्थेतील आपले योगदान 2030 पर्यंत 60 टक्क्यांपर्यंत पोहोचेल. पुढील दशकापूर्वी भारत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

जगात आशियाचे वाढते वर्चस्व
मुकेश अंबानी पुढे म्हणाले की, जागतिक अर्थव्यवस्थेत आशिया आणि विशेषतः भारताचा वाटा वाढत आहे. यावेळी जागतिक अर्थव्यवस्थेत आशिया हे आकर्षणाचे केंद्र असून त्याचा दबदबा वाढत आहे. 2020 मध्ये महामारीने प्रभावित होऊनही, आशियाई देशांचा जीडीपी संपूर्ण जगात सर्वाधिक राहिला आहे. यादरम्यान त्यांनी हरित ऊर्जेला चालना देण्याबाबत आणि या क्षेत्रातील भारताच्या आघाडीच्या भागीदारीबद्दल भाष्य केले. 

तीन दिवस चालणार समिट आहे
पुणे इंटरनॅशनल सेंटर पॉलिसी रिसर्च थिंक टँक आणि परराष्ट्र मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एशिया इकॉनॉमिक डायलॉग 23 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान चालणार आहे. या वेळी परिषदेची थीम पोस्ट-पँडेमिक वर्ल्ड इन रेझिलिएंट ग्लोबल ग्रोथ अशी ठेवण्यात आली आहे, ज्यामध्ये विविध क्षेत्रातील दिग्गज साथीच्या आजारातून सावरलेल्या जगासमोरील आव्हानांवर चर्चा करत आहेत.
 

Web Title: Mukesh Ambani | Pune | Asia Economic Dialogue2022 | 'India's contribution to world economy will be 60 per cent by 2030', Says Mukesh Ambani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.