Join us

Mukesh Ambani: आईस्क्रीम मार्केटमध्येही नशीब आजमावण्याच्या तयारीत मुकेश अंबानी, २० हजार कोटींच्या मार्केटवर नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2023 4:43 PM

रिलायन्स इंडस्ट्रीज वेगाने वाढत असलेल्या आईस्क्रीम मार्केटमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.

देशातील सर्वात व्हॅल्युएबल कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) वेगाने वाढत असलेल्या आईस्क्रीम मार्केटमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स रिटेल व्हेंचर्सची (Reliance Retail Ventures) एफएमसीजी कंपनी इंडिपेंडन्स (Independence) ब्रँडसह रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स (Reliance Consumer Products) प्रवेश करू शकते. कंपनीनं गेल्या वर्षी गुजरातमध्ये हा ब्रँड लाँच केला. आईस्क्रीम तयार करण्याचं काम आउटसोर्स करण्यासाठी कंपनी गुजरातमधील एका कंपनीशी बोलणी करत आहे. रिलायन्सच्या एन्ट्रीमुळे संघटित आईस्क्रीम मार्केटमध्ये स्पर्धा वाढू शकतं, असे बाजारातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. देशातील आईस्क्रीमची बाजारपेठ २० हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. यामध्ये संघटित क्षेत्राचा 50 टक्के हिस्सा आहे.

यासंदर्भात रिलायन्सला पाठवलेल्या ईमेलला कंपनीने प्रतिसाद दिला नाही. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलंय. कंपनीला त्यांची उत्पादनं FMCG सेगमेंटमध्ये लाँच करायची आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातच्या आइस्क्रीम कंपनीशी चर्चा अंतिम टप्प्यात आहे. कंपनी या उन्हाळ्यात आपलं आईस्क्रीम लाँच करू शकते. कंपनी तिच्या समर्पित किराणा किरकोळ दुकानांद्वारे आइस्क्रीमची विक्री करू शकते. कंपनी इंडिपेंडन्स ब्रँड अंतर्गत खाद्यतेल, डाळी, तृणधान्ये आणि पॅकेज केलेले खाद्यपदार्थ विकते. रिलायन्सच्या आगमनानं आईस्क्रीम मार्केटमध्ये मोठा बदल होऊ शकतो आणि स्पर्धा वाढेल. कंपनीची उत्पादन श्रेणी काय असेल आणि ती कोणत्या बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करेल हे पाहणे महत्त्वाचं ठरणार असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं.

सध्याकोणाचंवर्चस्वभारतातील आईस्क्रीमची बाजारपेठ २० हजार कोटी रुपयांची आहे. यामध्ये संघटित क्षेत्राचा वाटा ५० टक्के आहे. देशातील लोकांचे डिस्पोजेबल इन्कम वाढत आहे. यासोबतच देशातील आईस्क्रीम मार्केटमध्ये पुढील पाच वर्षांत दुहेरी अंकी वाढ होण्याची अपेक्षा आहे. ग्रामीण भागातही मागणी वाढत आहे. अशा परिस्थितीत आणखी अनेक कंपन्या या बाजारात उतरू शकतात. हॅवमोर आइस्क्रीम्स, वाडीलाल इंडस्ट्रीज लिमिटेड आणि अमूल वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी त्यांची क्षमता वाढवत आहेत. रिलायन्सनं नुकतेच डेअरी क्षेत्रातील दिग्गज आरएस सोढी यांची निवड केली आहे. सोधी यांनी अनेक वर्षे अमूलमध्ये काम केलं आहे.

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्स