Lokmat Money > बिझनेस न्यूज > Share Market: अंबानी-अदानींवर लक्ष्मी प्रसन्न! मुहूर्त ट्रेडिंगला शेअर्स वधारले; अब्जाधीशांवर पैशांचा पाऊस

Share Market: अंबानी-अदानींवर लक्ष्मी प्रसन्न! मुहूर्त ट्रेडिंगला शेअर्स वधारले; अब्जाधीशांवर पैशांचा पाऊस

Share Market: दिवाळीत मुहूर्त ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. रिलायन्स आणि अदानी ग्रुपचे शेअर वधारल्याचे सांगितले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 02:44 PM2022-10-25T14:44:44+5:302022-10-25T14:47:54+5:30

Share Market: दिवाळीत मुहूर्त ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. रिलायन्स आणि अदानी ग्रुपचे शेअर वधारल्याचे सांगितले जात आहे.

mukesh ambani reliance industries and gautam adani group share increase in share market diwali muhurat trading 2022 | Share Market: अंबानी-अदानींवर लक्ष्मी प्रसन्न! मुहूर्त ट्रेडिंगला शेअर्स वधारले; अब्जाधीशांवर पैशांचा पाऊस

Share Market: अंबानी-अदानींवर लक्ष्मी प्रसन्न! मुहूर्त ट्रेडिंगला शेअर्स वधारले; अब्जाधीशांवर पैशांचा पाऊस

Share Market: एकीकडे देशात दीपोत्सव उत्साहात साजरा केला जात असताना, दुसरीकडे गुंतवणूकदारांचीही दिवाळी झाली आहे. शेअर बाजारात दिवाळीला मुहूर्त ट्रेडिंग केले जाते. या मुहूर्त ट्रेडिंगच्या (Share Market Diwali Muhurat Trading 2022) काही तासांत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक झाल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये रिलायन्सचे (Reliance) आणि अदानी ग्रुपचे (Adani Group) शेअर वधारल्याचा फायदा अनुक्रमे मुकेश अंबानी आणि गौतम अदानींना झाल्याची माहिती देण्यात आली आहे. 

दिवाळीचा दिवस हा शेअर बाजारासाठी खूप खास मानला जातो. या दिवशी बाजार बंद असला तरी, एक तासासाठी मुहूर्त ट्रेडिंग आयोजित करण्यात येते. हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. देशांतर्गत स्टॉक एक्स्चेंज बीएसई आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज २४ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी मुहूर्त ट्रेडिंग झाले. यामध्ये अदानी आणि अंबानी यांना मोठा फायदा झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिग्गज गुंतवणूकदार इलॉन मस्क यांना प्रचंड नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. 

इलॉन मस्क यांची मालमत्ता २.०२ अब्ज डॉलरने कमी झाली

दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनच्या निमित्ताने शेअर बाजारात २४ ऑक्टोबर रोजी एक तासाचे मुहूर्त ट्रेडिंग सत्र पार पडले. अमेरिकन शेअर बाजार निर्धारित वेळेनुसार खुला राहिला. शेअर बाजाराचे दोन्ही निर्देशांक तेजीत होते. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांची मालमत्ता २.०२ अब्ज डॉलरने कमी झाली. मस्कची कंपनी टेस्लाचे शेअर्स १.४९ टक्क्यांनी घसरले. तर, ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, अदानी, अंबानी ते लॅरी एलिसन यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे.

भारतीय अब्जाधीशांची संपत्तीही मोठ्या प्रमाणात वाढली

दिवाळीचे महत्त्व भारतीयांसाठी मोठे असले तरी बिल गेट्स, वॉरेन बफेट, लॅरी पेज, सर्जी ब्रिन, स्टीव्ह वोल्मर यांसारख्या अब्जाधीशी संपत्ती प्रत्येकी एक अब्ज डॉलर्सनी वाढली. तर, मुकेश अंबानी आणि अदानी यांच्याशिवाय शिव नाडर, अझीम प्रेमजी, राधाकृष्ण दमानी, लक्ष्मी मित्तल, दिलीप सांघवी आणि सायरस पूनावाला यांसारख्या टॉप-१० भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीतही वाढ झाली आहे. दिवाळीच्या दिवशी मुकेश अंबानींच्या संपत्तीत २८४ दशलक्ष डॉलरची वाढ झाली, तर शिव नाडर यांनी ८७.५ दशलक्ष डॉलरची कमाई केली. याशिवाय अझीम प्रेमजी यांनी ८९ तर राधाकृष्ण दमानी यांनी ६७ दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्तची कमाई केली.

दरम्यान, दिवाळीत मुहूर्त ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. बीएसईचा सेन्सेक्स ४९७ अंकांच्या मोठ्या वाढीसह ५९,८०४ अंकांवर उघडला. व्यवहाराच्या सत्रात सेन्सेक्समध्येही चांगली वाढ दिसून आली. सेन्सेक्स ६० हजाराच्या अगदी जवळ पोहोचला. दुसरीकडे, सेन्सेक्समधील ३० समभागांपैकी २८ समभाग वाढीसह बंद झाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: mukesh ambani reliance industries and gautam adani group share increase in share market diwali muhurat trading 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.