Reliance Industries : वाढत्या मंदीच्या बातम्यांदरम्यान एक आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. देशातील दिग्गज रिलायन्स इंडस्ट्रीजनं गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात खर्चात कपात केली. कंपनीनं आपल्या वार्षिक सर्वसाधारण अहवालात मनुष्यबळ कमी करण्याची घोषणा केली आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ३,८९,००० होती, ती २०२४ मध्ये ३,४७००० वर आली आहे. रिलायन्स रिटेलमध्ये रिलायन्स समूहानं खर्चात सर्वाधिक कपात केलीये.
काय म्हटलंय वार्षिक अहवालात?
रिलायन्स इंडस्ट्रीजनं आर्थिक वर्ष २०२४ मध्ये वर्षभरापूर्वीच्या तुलनेत आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ११ टक्के किंवा ४२,००० नं कमी केली आहे. याद्वारे कॉस्ट एफिशिअन्सी आणि विशेषत: किरकोळ क्षेत्रात कमी नियुक्तीकडे लक्ष वेधतात. आरआयएलच्या ताज्या वार्षिक रिपोर्टनुसार, नवीन नोकरभरतीची संख्या एक तृतीयांशनं कमी करून १,७०,००० करण्यात आली आहे.
रिटेलमध्ये सर्वाधिक कपात
समूहाच्या कामगार कपातीचा मोठा भाग त्यांच्या रिटेल व्यवसायात होता, जो आर्थिक वर्ष २०२३ मध्ये आरआयएलच्या २,०७,००० कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या सुमारे ६० टक्के होता. ही संख्या आर्थिक वर्ष २०२३ मध्ये २,४५,००० होती. जिओने आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कर्मचाऱ्यांची संख्या ९५,००० वरून ९०,००० पर्यंत कमी केली आहे. 'आर्थिक वर्ष २०२३ च्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२४ मध्ये नोकरी सोडण्याची संख्या अत्यंत कमी आहे,' असं RIL नं म्हटलंय.
२५,६९९ कोटींचा अतिरिक्त खर्च
कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधांच्या खर्चात ३ टक्क्यांची वाढ झाली आहे आणि ती वाढून २५,६९९ कोटी रुपये झालीये. म्हणजेच कंपनीवर इतक्या खर्चाच अतिरिक्त भार आलाय.