देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) लिमिटेड नवा डाव खेळण्याची तयारी करत आहे. रिलायन्स ब्रिटनची कंपनी बीपी (BP) यांचे जॉईंट व्हेंचर रिलायन्स बीपी मोबिलिटी हायवेंवर (Highway) असलेल्या आपल्या पेट्रोल पंपांवर रिटेल आऊटलेट उघडण्याची योजना बनवत आहेत. कंपनी हायवेवर असलेल्या रिलायन्सच्या पेट्रोल पंपांवर (Reliance Petrol Pump)कॅफे, डिजिटल आणि इलेक्ट्रीक गाड्यांचे चार्जिंगचा व्यवसाय सुरु करु शकते. (Reliance can start retail outlets, EV charging point, Cafe on there petrol pump.)
सरकारी पेट्रोल पंपांपेक्षा 1 रुपये कमी दराने रिलायन्स पेट्रोल, डिझेल विकते. वाहनचालकांना आकर्षित करण्यासाठी तशा प्रकारची जाहिरातही कंपनी पेट्रोल पंपाबाहेर करते. एकेकाळी रिलायन्सचे पेट्रोल पंप खूप चालत होते. परंतू कालांतराने दर चढे असल्याने व काही अन्य कारणांमुळे हे पेट्रोल पंप बंद पडले होते. या काळात मोक्याच्या जागा हातच्या जाऊ नयेत म्हणून कंपनी पेट्रोल पंप मालकांना नियमित भाडे देत होती. पेट्रोल, डिझेलवरील सरकारी निय़ंत्रण उठल्यानंतर कंपनीने पुन्हा हे पेट्रोल पंप सुरु केले आहेत. परंतू, ग्राहकांचा म्हणावा तेवढा ओढा रिलायन्सच्या पंपावर जाऊन इंधन भरण्याकडे नसतो.
यामुळे या जागेचा वापर पेट्रोल पंपांसह अन्य व्यवसायासाठी करण्याची योजना कंपनीने आखली आहे. मीडिया रिपोर्टनुसार रिलायन्स रिटेल ही आऊटलेट ऑपरेट करणार आहे. यामध्ये स्मार्ट प्वाइंट कन्वीनियंस स्टोर्स, डिजिटल स्टोर्स, चार्जिंग पॉईट, कॅफे आणि अन्य फूड अँड बिअवरेज आऊटलेट असणार आहेत. यासाठी रिलायन्स अन्य फूड अँड बिअवरेज कंपन्यांसोबत चर्चा करत आहे.
सध्याच्या घडीला देशात रिलायन्स बीपीचे 1400 पेट्रोल पंप आहेत. पुढील पाच वर्षांत ते 5500 वर नेण्याची योजना आहे. देशात वाढणाऱ्या हायवे रिटेलिंग कन्सेप्टचा फायदा उठवायचा आहे. अमेरिकेनंतर सर्वात मोठे भारतातील हायवेंचे जाळे आहे. रिलायन्स यासाठी सबवे विकत घेण्याच्या तयारीत आहे. सबवेचे मुख्यालय अमेरिकेत आहे. ही कंपनी जगभरात पुनर्बांधणी करत आहे. ही डील 1,488 कोटी ते 1860 कोटी रुपयांना होण्याची शक्यता आहे. रिलायन्सकडे फार्मसी, डिजिटल स्टोअर, किराना स्टोअर आधीपासूनच आहेत. याचा फायदा कंपनी घेण्याच्या तयारीत आहे.